
गोड बोलून बघू या
गोड बोलून बघू या
रूसलेले कोणी हसते का
स्मितहास्यामध्ये ,अलगद कोणी फसते का
गोड बोलून बघू या
होईल का कोणी आपले
अनोळखी नात्यात सापडतील का स्वप्ने
गोड बोलून बघू या
चेहरे शांत होतील का
रागावलेल्या चेहऱ्यावर हास्य लगेच उमलेल का
गोड बोलून बघू या
मिटेल का आपसी भांडण
एकमेकांतील हेव्यादाव्यांचे होईल का मुंडण
गोड बोलून बघू या
अनोळखी रस्ता जरी का
वाटसरू कोणी, आनंदी जीवन जगण्या भेटेल का
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड