
आनंदवाटा
नभ भरुन आलेले
मनास फुंकर घालताना
आठव सुखद हसली
माझे मलाच पाहताना…
हास्यशिरोमणी वदनी फुलले
ओळख जुनी स्मरताना
घन सुगंधी कवेत
कातरवेळ धुंद होताना
दवबिंदू मोतिया खुलले
रविकिरणांची किणकिण होताना
परसात केवडा मोहक
स्नेहगंध गुलाबी लाजताना
कल्पवृक्ष खुशीत नाचले
चिंब पावसात भिजताना
थेंब थेंब आसुसलेले
तुझीच वाट पाहताना
थेंब थेंब आसुसलेले
तुझीच वाट पाहताना…
सौ उर्मी ( हेमश्री) घरत,पालघर