

समजून घे ना
आई तुझा संघर्ष पाहता
मज कळला नाही कधी
हातावरचे फोड बघून
हृदय कालवले कधी
कायम राबत राहीली
पाठीचा कणा मोडेस्तवर
पण नाही कधी झुकली
पर्यायी व्यवस्थेसमोर
विटा उचलताना जेव्हा
बोटे फुटायची तुझी
डोळ्यातल्या वेदना पाहून
आग पेटायची माझी
मागितले नाही कधीच
कुणालाही कापडलत्ता
तूझ्या वरच गाजवली
माझ्या बापाने सत्ता
पाठीवरचे वळ सकाळी
सांगायचे नवी कहानी
समजून घे ना आई
कशी राहू समाधानी
हूंकारणे रागाने कधी
आवडून घेतले नाही
कशी परतफेड करू ग
जीव तूझ्यात गुंतून राही
सविता धमगाये
आंबेडकर नगर,जि. नागपूर