
कधी वाटते
जगावे सुखी जीवन
कधी वाटते मनातून
फिरावे मी वाऱ्यावर
फुलपाखरू होऊन!
व्हावे मी पक्षी सुंदर
फिरावे आभाळातून
मन डोकावते छान
हसऱ्या चांदण्यातून!
कधी वाटते मनाला
घ्यावे नभ पांघरून
यावे हसत घरातून
हिरवा शालू मी नेसून!
आई बाबांचे हे मन
शोधते रे डोळ्यातून
प्रेमळ दोघांची माया
हळव्या रे हृदयातून!
आलो मी दूर फिरून
होतं थोड उदास मन
वाहिले दुःखाचे अश्रू
घळ घळ डोळ्यातून!
कधी वाटते का तुला
यावं मला थोडं भेटून
प्रेमाचं हितगुज कधी
अनुभवावे स्पर्शातून!
तुझं माझं एकच मन
वेदना घेईल समजून
सदाबहार हेच जीवन
नको अश्रू डोळ्यातून!
कधी वाटते प्रेमातून
सात जन्मांचे वचन
आदर मिळे कृतीतून
सुंदर मानवी जीवन!
अशोक महादेव मोहिते
कवी,लेखक,सैनिक
बार्शी,जिल्हा सोलापूर