
गोड बोलून बघू या
निमित्त असो मग कोणतेही
गोड बोलायला काय हरकत
कडू बोलून स्वतःची इमेज
खराब असा का करतोय ?
व्यक्ती तितक्या असते प्रवृत्ती
अन् लबाड माणसाच्या वृत्ती
असतात म्हणून काय झाले
बदलत नसतात का मनोवृत्ती ?
मनात विचार असतात जसे
सगळेच भेटत नसतात तसे
डावी कडवी विचार सरणी..!
काही वेळेपुरती असते जीवनी
गोड बोलून होतात सर्वच
न होणारे ते काम पूर्ण..!
धार्मिक परंपरेचा हा प्रयत्न
जपून ठेवा अनमोल रत्न..!
आम्ही गोड बोलून बघू या
मकर संक्रांतीच्या निमित्त
आचरणात फरक नक्कीच
पडेल तिळगुळापेक्षा जास्त
चंदू डोंगरवार
अर्जुनी मोर, जि.गोंदिया
======