मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताची मागणी मंजूर

मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताची मागणी मंजूर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या अत्यंत महत्वाच्या मागणीला मंजुरी दिली आहे. हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

यासंदर्भात गेल्यावर्षीच भारताने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी चीनने नकाराधिकार वापरत त्यात खोडा घातला होता. पण यावेळी भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त मागणीसमोर चीनलाही नमते घ्यावे लागले आणि लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झाला आहे.

जगभरातल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्या या क्रुरकर्म्याला आता युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. युनायटेड नेशन्सने जाागतिक दहशतवादी घोषित केल्यामुळे मक्कीची जगभरातली मालमत्ता आणि संपत्ती गोठवली जाईल. या कारवाईमुळे मक्कीच्या प्रवासावर आता बंदी येणार आहे. मक्की यापुढे त्याच्या मालकीचे पैसे वापरु शकणार नाही. या कारवाईमुळे मक्कीला शस्त्रास्त्रांची खरेदीही करता येणार नाही. सोबतच अधिकार क्षेत्राबाहेर त्याच्या प्रवासावर गदा आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles