
उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे रविवारी पुण्यात प्रकाशन
वसुधा नाईक, प्रतिनिधी
बांदा: ‘नवी दिशा नवे उपक्रम’ या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा दि.२२ जानेवारी २०२३ रोजी, रविवारी पुणे येथे संपन्न होणार आहे.
देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपसंचालक रमाकांत काठमौरे, माजी उपसंचालक विकास गरूड, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले,राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादलाचे निळू
फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे सकाळी ११ते दुपारी ३या वेळेत संपन्न होणार आहे.
या पुस्तकात जे.डी.पाटील सिंधुदुर्ग, स्वाती पाटील सिंधुदुर्ग, बळीराम जाधव अहमदनगर, संतोष गवळी अहमदनगर, प्रदीप विघ्ने नागपूर, प्रमिला गावडे अहमदनगर, दिपाली लोखंडे पुणे, ध्रुर्वास राठोड जळगाव , शंकर चौरे धुळे, लता गवळी अहमदनगर , किसन फटांगडे अहमदनगर, गितांजली माथनकर यवतमाळ, रफत इनामदार पुणे, नेहा गोखरे यवतमाळ, रोहिणी गायकवाड बीड, उज्वला फटांगरे पुणे, सोपान बंदावणे पुणे ,सदानंद कांबळे रत्नागिरी, आयुब शेख पुणे , वसुधा नाईक पुणे, सीमा बोजेवार यवतमाळ, चित्रा गोतमारे यवतमाळ, रुकसाना शेख पुणे, बापू चतुर नाशिक, सुप्रिया चोरघे पुणे ,वैशाली काळे पुणे, मीनल पाडावे ठाणे, सरला गावडे अहमदनगर, हर्षदा चोपणे यवतमाळ , सतिश मुणगेकर रत्नागिरी, संजय पवार रायगड, सुहास दोरुगडे रत्नागिरी , रूपाली पाटील रत्नागिरी , शितल मदने पुणे, अनिता रहांगडाले भंडारा ,विजय वाघमोडे रत्नागिरी, संगीता म्हस्के पुणे , लता साळवे औरंगाबाद , करुणा गावंडे चंद्रपूर , वैशाली पाटील पालघर, तिरूमला माने पुणे, हेमलता चव्हाण पुणे ,स्मिता पाबरेकर रायगड , सुनिता निकम अहमदनगर, जया कुलथे अहमदनगर, मीनाक्षी नागराळे वाशिम, बंडोपंत नजन पुणे, विजय माने पुणे, झुंबर कदम पुणे, वनिता मस्कर पुणे या ५० उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे.