बालरंजन केंद्राला बालकार्य सन्मान प्रदान

बालरंजन केंद्राला बालकार्य सन्मान प्रदान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्काऊट गाईड या संस्थेचा वर्धापन सोहळा संपन्न_

पुणे: श्री शिवाजी कुल स्काऊट गाईड या संस्थेचे हे १०५ वे वर्षं असून या संस्थेच्या शतकोत्तर उत्सवामध्ये यंदाचा ‘बालकार्य सन्मान’ पुरस्कार पुण्याच्या ‘बालरंजन’ केंद्रास समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांच्या हस्ते हा पुरस्कार बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्वीकारला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या प्रसिध्द बाल साहित्यिक मा.संगीता बर्वे.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, तसेच नरेंद्र धायगुडे,
श्रावणी कदम, यश गुजराथी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले, “जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर ‘ज्ञान आणि रक्षा’ हा मंत्र आणि ‘हास्य व ध्यानयोग’ हे तत्त्वं अंगिकारायला हवे.

पुण्यात गेली ३५ वर्षे मुलांच्या सार्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या भारती निवास सोसायटीमधील बालरंजन केंद्रास सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू अशा स्वरूपात या पुरस्कार देण्यात आला आहे. हजारो मुलं सुद्रुढ व सुसंस्कारित करणा-या या केंद्राची मूळ संकल्पना नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांची आहे. सामाजिक जाणिवेतून सेवाभावी वृत्तीने बालविकासाच्या क्षेत्रात विशेष काम करणा-या माधुरीताईंनी बालरंजन केंद्राच्या माध्यमातून मोठे भरीव व रचनात्मक काम ऊभे केले आहे. या कार्याची उचित दखल घेऊन श्री शिवाजी कुल स्काऊट गाईड या मुलांसाठी काम करणा-या पुण्यातील जुन्या व प्रतिष्ठीत संस्थेने ‘बालकार्य सन्मान’ पुरस्कार देऊन बालरंजन’ केंद्राच्या कार्याचे महत्त्व आधोरेखित केले आहे.

सत्काराला उत्तर देताना माधुरी सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत मांडले, ते म्हणाल्या, “आम्ही बालरंजन केद्राच्या माध्यमातून मुलांसाठी व्यायाम, खेळ, साहित्य, कला, संस्कृती अशा सर्व विषयाचे विविध उपक्रम घेऊन त्यांच्या भावनिक, बौध्दीक व शारीरिक विकासासाठी प्रयत्न करीत असतो मुलांना मानसिक व शारिरीकदृष्टया खंबीर करण्याकरिता जीवनातील सर्व पैलुंचा विचार करून ज्ञान आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आनंदी बालपण देण्याच्या या कामाची दखल स्काऊट गाईड सारख्या मान्यवर संस्थेने घेतली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार”

धनश्री देवधर, कीर्ती कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. “द्या खेळाला एक तास, विधायक उपक्रमांतून बालविकास” हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या बालरंजन केंद्राशी अनेक बाल-किशोर, त्यांचे पालक, विविध विषय तज्ञ जोडले गेले असून या सर्वांनी पुरस्काराबद्दल माधुरीताईंचे व केंद्राचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles