‘मासिक पाळी’; वसुधा नाईक

‘मासिक पाळी’; वसुधा नाईकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एम.सी. म्हणजे काय? तर मंथली कोर्स असे आमच्या सासुबाईंनी छान समजून सांगितले होते. एम.सी.म्हणजेच मराठीत मासिक पाळी. दर अठ्ठावीस दिवसातून बाईला ही पाळी येते. यामुळे स्त्रीत्व प्राप्त होते. मानववंशाचा दीप पेटता राहण्यासाठी ही शारिरीक क्रिया फार महत्वाची आहे. पूर्वी बाईला हा मासिक धर्म आला, की बाईला वेगळे बसवले जायचे.घरात विटाळ नको म्हणून.पण या मुळे बाईला जरासा स्वयंपाकापासून रिकामा वेळ मिळायचा.सुट्टी मिळायची.जरासा आराम मिळायचा. आणि भांडी घासणे, धुणं धुणे. अशी ककमे तिच्याकडून घ्यायची व त्यावर पाणी शिंपडले की ते शुद्ध होणार असे पूर्वी मानायचे,पण हे कसे काय?एकूण काय तर तिला रिकामे बसून द्यायचे नाही.असो..!

खूप बंधन पाळावी लागायची.शिवाशिव नको. इथे हात नको लावू तिथे हात नको लावू. असे नवीनच मासिक धर्म आलेल्या छोट्या लेकराला सगळे बोलायचे. तिच्या कोवळ्या मनावर बंधनाचे ओरखडे उठायचे.पण तोंडातून शब्द नाही बाहेर पडायचा. मुलीला मासिक धर्म चालू झाला की तिचे खूप कौतुक होते.ते आजही होतेच. पण फक्त हल्ली मुलीला सर्व माहीत असते. मैत्रिणी, प्रसारमाध्यमे, नेटमाहिती या द्वारे माहिती मुलींना समजलेली असते.शाळेतही शिकवले जाते. मासिक धर्मामुळे स्त्रीत्व बहाल होते. पुरूषाचे शुक्राणू स्त्रीच्या शरीरात प्रवेश करून स्त्री ते आपल्या गर्भाशयात वाढवते व वंश वाढला जातो.

या धर्मात ओटीपोटात दुखणे.स्तन दुखणे, पाठ कंबर दुखणे असा एक, दोन दिवस त्रास होवू शकतो. पूर्वी मुली व बायका काॅटनचा कपडा वापरायच्या.त्या वेळी जंतूसंसर्गाचा धोका असायचा. त्या मुळे योनीमार्गाचे आजार व्हायचे.पण हल्ली भारी भारी चांगल्या नामवंत कंपन्यांचे सॅनिटरी पॅडस मिळतात.वापरा व फेकून द्या .तसा याचा वापर असतो.त्या मुळे जंतूसंसर्गाचा धोका कमी झाला आहे .तसेच स्त्रीयांचे आजारपणही कमी झालेय. समज गैरसमज हे लक्षात घेवून आपण सर्व महिलांनी, मुलींनी शरिराची स्वच्छता ठेवावी. काळजी योग्य तीच घ्यावी. मासिक पाळी दरम्यान काही त्रास झालाच तर डाॅक्टरी इलाज तावडतोब करावेत.

या विषयावर खूप बोलता येईल. विषय फार नाजूक व मोठा आहे. काही अनुभव शेअर करावेसे वाटतात..
१) मुलगी डॅशिंग ,करामती, मारामारीत सदा पुढे. जणू टाॅम बाॅयच. शाळेतून आली अंतरवस्त्र ओट्यावर फेकून दिले.आईला बोलली “आई,आज मी मस्ती केली नाही.पण हे बघ काय झालय.” आई घाबरली.अवघे लेकराचे चौथीचे वय.आठ संपले तरच हे काय सुरु…मग मुलीला विश्वासात घेवून मासिक धर्माबद्दल समजावून सांगितले. बिचारी छोटी ती खूपच मोठ्या माणसाप्रमाणे वागायला लागली.बालपण जणू हरवले.
२)वय नऊ वर्ष. पण आईने मासिक पाळीबद्दल तिला समज दिल्याने ती गुपचूप आईकडे आली. सांगितले व फ्री राहिली. तर आपल्या मुलींना जास्त नाही तर पुसटशी कल्पना द्यावी.शाळेत चौथीच्या मुलींना बोलते करावे. इतके तर आपण करूच शकतो. तर हा विषय हाताळणे खूप अवघड आहे. पण हाताळण्याचा प्रयत्न केलाय.

वसुधा नाईक,पुणे
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles