किती बघावी वाट?

किती बघावी वाट?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सेकंदा पासुन वर्ष सरले
आसवे सुकली डोळ्यात
‘किती बघावी वाट तुझी?’
ठेवू नको मज धोक्यात

जगावेगळी प्रित जडली
जीव अडकलाय तुझ्यात
मन‌ कुठ लागेना तुजवीण
तू तर माझ्या हर श्वासात

आतुर मी दर्शनास सख्या
वेडी झालीय तुझ्या प्रेमात
न बघताही जडलीय प्रित
जपली सदैव छवी ह्रदयात

क्षणाक्षणाला भास छळती
दूरूनही वाटे तू आसपास
तनमनात तूच भिनलेला
रात्रंदिनी रे तुझाच ध्यास

मुश्कील आता जगणे माझे
मिटव एकदाचे हे अंतर
मनभरून पाहु दे एकदा
मग प्राण गेले तरी बेहत्तर

अरविंद उरकुडे, गडचिरोली
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles