‘मनाला सावरण्यासाठी,जपून ठेवलंय ‘ते मोरपीस’; स्वाती मराडे

‘मनाला सावरण्यासाठी,जपून ठेवलंय ‘ते मोरपीस’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुझ्या आठवणी.. तुझा स्पर्श.. तुझं डोळ्यात हरवणंं.. तुझं मधाळ बोलणं.. तुझा सहवास.. तुझा आभास.. तुझ्याच शब्दांनी पुन्हा मला सावरणं.. सगळीकडे आहे तुझंच भरून उरणं… आठवांचे ते मोरपीस कितीदा मी स्मरावं.. चुकार थेंबांनी येऊन हळूच गालावर ओघळावं.. मनातला वन्ही कसा विझवावा.. चिरदाह वेदनेचा कसा शमवावा.. मोरपंखी आठवणींचा मग आठवतो एकेक क्षण.. त्याच मधुर क्षणात गुंतून राहतं मन…जपलं आहे मनात ‘ते मोरपीस’.. ते आठवांचे मोरपीस आठवले की विसरून जाते मनाची वेदना…मऊ मुलायम त्या अलवार स्पर्शाने.. त्या अलवार स्पर्शाने..!

ते मोरपीस मनावर
अलवार स्पर्श करून गेलं
काळजातलं ते काहूर
हळुवार शमवून गेलं..!

जीवनाच्या वाटेवर कितीतरी जण भेटतात.. काही स्मृतींंच्या पडद्याआड जातात तर काही मनात कायम घर करून राहतात. त्याच्या सोबत चालताना जगाचाही विसर पडतो‌. नव्हे नव्हे तोच आपले सगळे जग होऊन जातो. ती व्यक्ती सोबत असेल तर सगळी सुखं लोटांगण घेत आहेत असे वाटते तर ती नसेल तर गर्दीतही वाटते एकटे… तिच्यासोबत गालावर गुलाब फुलतात.. वारेही गंधित होऊन वाहतात.. प्रीत तारा छेडल्या जातात.. ओठांवर सुरेल ओळी सजतात.. असं कुणीतरी भेटतं तेव्हा जगणं सुंदर वाटतं.. तिच्या सोबतीच्या विचारांनीही देहावर मोरपीस फिरतं..!

मोरपीस… सुरेख रंगांनी सजलेले.. मध्यभागी हृदयाकार विशाल निळ्या रंगानी माखलेले.. पाहताच मन मोहून घेणारे..मनमोराचा पिसारा फुलवणारे.. मखमली मुलायम स्पर्श करणारे.. मनात प्रेम जागवणारे.. कान्हाच्या मुकुटावर विराजमान झालेले.. लहानपणी हातात मिळालं तर पुस्तकात ठेवून जिवापाड जपलं जायचं.. तर मोठेपणी ते कुणाच्या डायरीत जाऊन विसावतं… कुणी भेट म्हणून दिलेलं हे मोरपीस त्याचा मुलायमपणा जपत कायम टवटवीत राहतं त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणींसह.

आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र म्हणजे ‘ते मोरपीस’ चेह-याला स्पर्श करताच कितीतरी आठवणी मनात जागवून गेले..नजरेत उठलेले प्रश्नांचे मोहोळ… काळजातील वेदना.. सर्वांना अलगद थोपवून त्याचा मुलायमपणा पांघरून गेले असेच वाटले.. हे मोरपीस कवीकल्पनेसाठी आपलेपणाचा विषय असणारे.. आभाळात कृष्णमेघांची गर्दी होताच मयूर पिसारा फुलवून आनंदविभोर व्हावा तसे कवीवर्य मंगेश पैंजणे दादांनी एकेका मोरपीस रचनेची आरास मांडली. आणि सोबतीला जुगलबंदी रंगली संग्राम कुमठेकर दादांची.. कोणती रचना सरस नीरस असे काही नव्हतेच होता केवळ निखळ आस्वाद.. सर्वच रचनाकारांच्या अप्रतिम रचना लक्ष वेधून घेणा-या. अशीच आपणा सर्वांची लेखणी मोरपिसासम अखंड तजेलदार राहो या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे अभिनंदन 💐

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

स्वाती मराडे,पुणे
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles