
खेडं
खेड्यात जोपासले जातात सण उत्सव छंद…
इथल्या मातीला आहे निराळात गंध…
खेड्यात राहतात बारा बलुतेदार…
सगळ्यांचीच आहे एकमेकांवर मदार…
खेड्यात आहे खूप लळा व जिव्हाळा…
म्हणूनच आनंदाने राहतात इथे लेकी बाळा…
जपतात इथे वसुंधरेला आणि निसर्गाला फार…
म्हणूनच आहे इथला हिरवा शेत शिवार…
इथली माणसं वाटतात लाजाळू…
पण आहेत ती खूप मायाळू व कष्टाळू…
म्हणूनच…
खेड्याला म्हणू नका येड…
खेडच सोडवत आपल्या जीवनाचे कोडं…
अरुण पवार
(कळंब) धाराशिव