
शब्द मी गीत तू
तूच माझे गीत सख्या
संगीत तूच गीतातले
गीत तुझ्या मनातले
शब्दात मी मांडले
शब्द मी तू गीतं
तूच माझा युगायुगाचा मित
प्रथम भेटी पाहता तुला
हृदयी माझ्या फुलली प्रीत,
सांज सुरेख कातरवेळ
नजरानजर झाली अशी
राहिले ना मी माझीच
तेव्हा….
प्रीत अशी तुझ्यावर जडली,
एकेक शब्द तुझ्या
गीतातला
करितो दोघां कसे
रोमांचितं….
असेल का दैवी संकेत
हा….
भेट दोघांची झाली
अवचित
संध्या देशपांडे
दुर्ग, भिलाई छत्तीसगढ
========