
जनहितार्थ भव्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा : मुकेश रेवतकर यांचे आवाहन
नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जनहितार्थ भव्य शिबीर नवदुर्गा माता मंदिर विठ्ठल नगर नंबर १ नागपूर येथे मुकेश रेवततकर उपशहर प्रमुख शिवसेना नागपूर (जनसंपर्क उदयनगर चौक) यांनी आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे शिवसेना शहर प्रमुख दीपकजी कापसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मंचावरील लोकमत संखी मंचच्या वैशालीताई गिरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यात आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड, नवीन मतदान नोंदणी, ई श्रम कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे, नवीन आधार कार्ड नोंदणी आणि संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेचा जनहितार्थ भव्य शिबिरात शुक्रवार पासून तर रविवार पर्यंत सकाळी १० ते ४ पर्यंत लाभ घ्यावा. असे प्रभाग प्रमुख गौरव तिजारे, उपशहर प्रमुख शिवसेनेचे मुकेश रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित शिबिरांचा लाभ जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वस्तीतील नागरिकांनी घेण्यात यावा.
असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्रभाग प्रमुख गौरव तिजारे, प्रभाग कार्याध्यक्ष अखिलेशजी भुगावकर, शानु राऊत, राजुभाऊ टुले, सुधीरजी फुकटकर, सुनीलजी आगरकर, नानाभाऊ ठाकरे, अशोकजी तोटे, छडीरामजी नागपुरे, सुदामजी डोंगरदिवे, सौ. शीतलताई गोपेवार सौ.वैशालीताई गिरी सौ.मनिषाताई घागरे कुमारी. ओंकारी भुगावकर, शशीभाऊ डांगट, संकेत वंजारी, गिरीश जिपकाटे, यश ढोबाळे, संकेत ठाकरे यांनी परिश्रम घेतले. तसेच मयूर गावंडे यांनी खूप मोलाची भूमिका निभवली.