युवा लेखकाचे ऐतिहासिक पुस्तक- राऊची आई

युवा लेखकाचे ऐतिहासिक पुस्तक- राऊची आई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_लेखकाचा सत्कार संपन्न_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: पुणे शहर ज्यांच्या नावाने ओळखले जाते असे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, ईतिहासात महापराक्रमी अजिंक्य योध्दा म्हणून प्रसिध्द आहेत. अशा या थोर योध्दा बाजीराव बल्लाळ यांना ‘पेशवे ‘ पदाची मानाची वस्त्रे दि. १७ एप्रिल १७२० या दिवशी मिळाली होती. या घटनेला यंदा ३०३ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून “राऊची आई ” हे ऐतिहासिक पुस्तक लिहीणा-या सिद्धार्थ येवले या युवा लेखकाचा सत्कार नुकताच आयोजित करण्यात आला होता.

बाजीराव पेशवे यांना ” राऊ ” या लाडक्या नावाने घरातली जवळची मंडळी संबोधत असत. त्याच संदर्भाने “राऊची आई ” हे बाजीराव पेशवे यांच्या मातोश्रींच्या जीवनावर आधारीत पुस्तक सिद्धार्थ येवले या युवा लेखकाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लिहीले आहे.

“राऊ” व त्यांच्या मातोश्री यांचे भावबंध उलगडणारे हे १४३ पानी पुस्तक अभ्यासपूर्ण असून या नव्या छोटेखानी पुस्तकाचे सर्वत्र स्वागत होत आहे. ‘युवा पिढी वाचनालयातून दूर जात आहे’, अशी चिंता व्यक्त होत असताना एका विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्याने ऐतिहासिक विषय निवडून पुस्तक लिहले असल्याने उदयोन्मुख लेखक सिद्धार्थ येवले याच्या अनोख्या कामगिरीबद्दल सगळीकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच अनुषंगाने सारसबाग येथे नुकताच एका कार्यक्रमात सिध्दार्थ याचा पुणेरी पगडी, पेशवाई शेला देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या नवलेखकास “राऊं”च्या प्रतिमेसह ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात आली.

या कार्यक्रमास इतिहास व मोडी लिपीतज्ञ श्री.मंदार लवाटे , ईतिहासाचे अभ्यासक, श्री.जगन्नाथ लडकत, श्रीदेवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत , विश्वेश्वर सहकारी बँकेच्या संचालिका सुलभा कोकाटे , सामाजिक कार्यकर्ते दिलीप राऊत , प्रशांत एकतपूरे, अंजली येेवले, रामचंद्र मणेरीकर, शशिकांत धर्माधिकारी ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles