
‘पर्णवी करेल जकातदार घराण्याचे नाव उज्वल’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
सौ.वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे: नुकताच पर्णवी जकातदार ह्या ज्योतिर्विद बालिकेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अवघ्या 10 वर्षाच्या चिमुकलीने ज्योतिष शास्त्रावर काही दिवसांपूर्वी तब्बल पाऊण तास अभ्यासपूर्ण असे प्रभावी व्याख्यान
दिले .तिचे कौतुक करण्यासाठी
ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि डहाळी अनितकालिकाचे संपादक यांनी
डहाळीच्या विशेषांकात Planets In Solar System हा पर्णवी जकातदारचा लेख तिच्या फोटोसह समाविष्ट केला.
पर्णवीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर डहाळीचा 418 वा विशेषांक प्रकाशित करण्यात आला.याप्रसंगी संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यासह पर्णवी, फलज्योतिष मंडळाचे पदाधिकारी
सौ.पल्लवी चौहान, सौ.आरती घाटपांडे, हर्षद जकातदार तसेच फलज्योतिष अभ्यास मंडळाचा विद्यार्थ्यी वर्ग उपस्थित होता. ज्येष्ठ ज्योतिर्विद स्व.पं.श्रीकृष्ण जकातदार यांचे सुपुत्र ख्यातनाम ज्योतिर्विद पं विजय जकातदार यांची जकातदार घराण्याची ज्योतिषशास्त्राचा दुसरी पिढी, तर पं.विजय जकातदार यांची कन्यका युवा आघाडीची ज्योतिर्विद सौ.पल्लवी चौहान ही तिसरी पिढी आणि आता पं.विजयराव जकातदार यांची नात बाल ज्योतिर्विद पर्णवी जकातदार ही चौथी पिढी उदयास येत आहे.
या यशस्वी 4 पिढ्यांविषयी कृतज्ञतापूर्वक गौरव करताना डाॅ.मधुसूदन घाणेकर म्हणाले की कुंडलीतील भाग्यस्थान बलवान असलेल्या व्यक्ती घराण्याचे नाव उज्ज्वल करतात, याचे प्रतिबिंब पर्वणीच्याही कुंडलीत असल्याने आगामी काळात पर्णवी जकातदार ही निश्चितच जकातदार घराण्याचे नाव उज्ज्वल करेल. कार्यक्रमाचे संयोजन हर्षद जकातदार याने केले.सौ.पल्लवी जकातदार चौहान यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सौ.आरती घाटपांडे यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. वाढदिवसा निमित्त केक काढल्यावर पर्णवीने पत्त्याची जादू करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली.