‘बाळगुट्टी म्हणजे आयुष्याच्या चैतन्याची संजीवनीच’; प्रा. तारका रूखमोडे

‘बाळगुट्टी म्हणजे आयुष्याच्या चैतन्याची संजीवनीच’; प्रा. तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण_

भन्नाट खेळ
निखळतेचा फेर
आनंदी मेळ

गोल गोल राणी..इट्टा इट्टा पाणी…आठवलं ना शिलेदारांनो!!!.. तो भन्नाट खेळ बालपणीचा..फेर धरून खेळायचो. हसायचो..बागडायचो..मनसोक्त पावसातही भिजायचो..चिंचा,कैऱ्या पाडतांना भर उन्हात घामात थिजायचो..मन उधान वाऱ्यापरी.. हळव्या निखळ स्पर्शाने खुलायचे,निरागसतेच्या मैत्रीबंधात धुंद मोहरायचे.. फेर धरून नाचू गाऊ लागायचे..

खरंच.. किती सुंदर असतं ना बालपण!!.. सागराच्या अंतर्मनातील निखळ गाज..वाऱ्याचा शितल गारवा देणारा अवखळ बाज..पानांची सुंदर सळसळ..निखळ झऱ्याची खळखळ..सुंदर सुमनांचा लोभस परिमळ..उडत्या पाखरांची जणू सुरेल शीळ..स्वच्छंदी विहरणारे छोटे घननीळ..उगवत्या रवीची स्वर्णिम कोवळी किरणं..अनघड कंठाची किलकिलणारी ती सुंदर स्वच्छंदी निर्मळ मनं..सृष्टीतील या सर्वच निरागस सुंदरतेचा मिलाफ म्हणजे बालपण..!

बालपण..सर्वात सुंदर काळ..ते बालपणीचे भन्नाट खेळ, भातुकलीचा डाव,आंधळी कोशिंबीर, लंगडी, विटी दांडू, मामाचं पत्र हरवलं, हातात हात धरून फेर धरून रिंगण घालणं, पावसात चिखल उडवत मनसोक्त धावणं,चिंचा,आवळे,आंबे चोरून खाणं..ना कसली ईर्ष्या,ना कसली आकस,ना भ्रांत..सारं विश्रांत..फक्त दोन बोटे जोडली की दोस्तीचं रिंगण..अगदी निर्विकार,निकोपी, स्वच्छंदी अंगणातलं बालपण.. विविध खेळातून आनंद शोधणं, जगणं सुंदर व समृद्ध करणं..एवढंच..
बाळगुट्टी म्हणजे आयुष्याच्या चैतन्याची संजीवनीच जणू!!

पण हल्ली ‘कालाय तस्मै नमः’
काळाच्या लाटेने नेला तो किनाऱ्यावरचा बालपणीचा निरागसतेचा वाळूचा किल्ला..त्या गाभुळलेल्या चिंचा व गावाकडचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडायला लागलेत हल्ली.कारण त्यांनाही कळून चुकले दगड मारणारं बालपण आता मोबाईल मध्ये हरवलंय..लेकरांच्या नशीबी शहरे आलीत..मातीचे अंगणे गेलीत..उंच इमारतींच्या विशिष्ट मर्यादेत अवखळ बाल्यही दिवसेंदिवस अरुंद होत चाललंय,बाहेरचं विश्व त्याला गजाआडून पाहावं लागतं.शहरी संस्कृतीत आऊटडोअर, इनडोअर ‘गेम’ असतात. ग्रामीण भागात फक्त ‘खेळ’ असतात.( ‘खेळ’ शहरी भागातील पालकांच्याच पचनी पडत नाही, त्यांना गेम हवा असतो ‘इंग्रजीच्या मिथ्या अहंकारात बालपणच कोळपून टाकतात)..

आधुनिकतेत गरजा पूर्ण करणारी साधन सामुग्री मिळाली तरी बालपण जगता येत नाही ते हरवत चाललंय.काॅन्व्हेन्टरूपी अपेक्षांच्या ओझ्यामुळे खेळातून,संवादातून फुलणारी सृजनशीलता कमी होत चाललीय..

आज खऱ्या अर्थाने सुंदर वातावरणाची, बालपणीच्या पारंपारिक खेळाची खरी गरज आहे. म्हणूनच बालपणीचे रम्य सोनेरी क्षण..आठवांच्या गावातलं अंगण..त्या अंगणातलं स्वच्छंदी बालपण..त्या पाच पैशाच्या लिमलेटच्या गोळ्या,घोटीव पेपर होड्या, चमचम सागरगोटी, सहभोजनात ओढून खाल्लेली रोटी, मनाच्या कोपऱ्यात ह्या आठवणी दडलेल्या असतात त्यांची सय अधिक गडद करण्यासाठी,ते क्षण लेखणीरुपात पुन्हा नव्याने जगण्यासाठी कदाचित आ.राहुल सरांनी हे पारंपारिक रिंगण खेळाचं, निखळ आनंद,एकोप्याची भावना तनमन समृद्ध करणारं खेळाचं बोलकं चित्र दिलेलं..यावर सर्व आमचे प्रतिभावंत खरंच बालपणाच्या आठवात हरवलेत..व लेखणीतून बालपण पुन्हा प्रसवलं..
सर्व सारस्वतांचं हार्दिक अभिनंदन..असेच लिहिते व्हा..

थोडसं मनातलं-
लहानपण देगा देवा !! मुंगी साखरेचा रवा..असेच जगू या 🙏
हायकूच्या तिसऱ्या ओळीत कलाटणी देताना सुंदर ‘आशय’ येऊ द्या..

आ.राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त्त आभार🙏🙏

प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि गोंदिया
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/संकलक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles