गृहिणी

गृहिणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्वयंपाक केला आज तिने चटपटीत छान
ऐकण्यास गुणगान आतूर झाले कान..

पोळ्या केल्या तिने छान मऊ-मऊ
जेवता-जेवता बोलले घरचे,
“प्रतदार होता हो गहू”…!

भाजी केली तिने मसालेदार मस्त
जेवता-जेवता बोलले घरचे,
” वांगे आहेत हो चविष्ट “..!

कढी केली तिने छान चवदार
पीता-पीता बोलले घरचे,
” दही होता मस्त घट्टदार “..!

ऐकून सारे, नाक लाल झाला
तोंडात यायच्या आत,
घेतला तिने प्याला..

घटाघटा पीला पाणी..!
स्वतः शीच पुटपुटली ती,
ओ.. हो.. मी तर एक गृहिणी..!

वनिता गभने
आसगाव, जि.भंडारा
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles