
जिद्दीचा प्रवास
जिद्दीच्या प्रवासात
लढायचं असतं फक्त स्वतःला
झुगारून सर्व बंधने
धडपडायचं असतं सिद्ध करायला
स्वतःला सिद्ध करण्याची
दवडायची नसते संधी
गेलेले क्षण पुन्हा
येत नसतात कधी
संधी दरवाजा एकदाच ठोठावते
अपेक्षील्यास रुसून बसते
झाले जरी किती मनावर आघात
सामर्थ्याने करायची असते संकटावर मात
जिद्दीचा प्रवास म्हणजे
स्वतः स्वतःला सिद्ध करणं
भट्टीत शेकल्या जाणाऱ्या पोलादाप्रमाणं
तावून सुलाखून निघणं
सोपा नसतो मुळी जिद्दीचा प्रवास
प्रयत्नांची धरायची असते कास
तेव्हा तर यश मिळते हमखास
पण आता बांधली मनाशी खूणगाठ
गाठायची आहे स्वप्नांची पहाट
बेरंग झालेल्या दुनियेला
रंगांचा चढवून साज
त्यासाठी आहे मात्र जिद्द अफाट..
जिद्द अफाट..
स्नेहल संजय काळे
ता.फलटण, जि.सातारा