डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित चारोळ्यांचा ‘ गुलमोहर ‘ फुलला !

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित
चारोळ्यांचा ‘ गुलमोहर ‘ फुलला !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*_सौ.वसुधा नाईक, पुणे सध्या -डेट्राॅईट, मिशिगन स्टेट, अमेरिका_*

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित देशविदेशी निवडक कवयित्रिंच्या चारोळ्यांचा ‘गुलमोहर ‘या प्रातिनिधिक संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री आणि वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा सौ.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कवी आणि पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘गुलमोहर ‘प्रातिनिधिक चारोळी संग्रहात स्वतःच्या हस्ताक्षरातून चारोळ्यांचा अक्षर अन अक्षर खुलवून त्याचा सुगंध काव्यविश्वात सर्वत्र फुलवला आहे. देशविदेशातील कवयित्रींना काव्यक्षेत्रात निरपेक्षपणे मानाचे स्थान निर्माण करुन देणारे डाॅ.घाणेकर यांच्यासारखे प्रतिभासंपन्न कवी दुर्मिळच. स्वतः प्रथितयश कवी असलेल्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हे योगदान निश्चितच वाखाणण्यासारखे आहे. असे प्रतिपादन कवयित्री सौ.वसुधा नाईक यांनी केले.

आपला कवितेचा व्यासंग जतन करताना प्रतिभावंतांनी कवितेतील फाॅर्मवर मन एकाग्र करताना त्यातील आशयघनता कशी वाढेल यावर अधिक लक्ष द्यावे.असे संपादकीय मनोगत व्यक्त करताना कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सांगितले. तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी संयोजन केले.

मंजिरी जोशी, कांचन प्रकाश संगीत, सारिका सासवडे, संगीता कुलकर्णी, गीतांजली वाणी, प्रतिमा काळे, अनुष्का गोवेकर आम्रपाली धेंडे, भाग्यश्री बागड आदि 28 कवयित्रिंच्या चारोळ्या गुलमोहर संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. सदर संग्रह वर्ल्ड लिटरेचर संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला. मुखपृष्ठ,अक्षर रेखाटन, रेखाचित्र, मांडणी,सजावट संकल्पना, संकलन, निर्मिती, वितरण सबकुछ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी विनामूल्य केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles