
तुझ्या नजरेचा इशारा
तुझ्या नजरेचा तीर
करी घायाळ वारंवार
देतो इशारा हळुवार
घ्यावं समजून तू सारं!
नाही बंधन तुझ्यावर
कर स्विकार नाकर
जरी दिलासा होकार
ओळखतो मी बरोबर!
कुणाचा राग कुणावर
रागावू नको तू मजवर
सोबतीला तू निरंतर
सांगतो तुला ग सारं !
जिवापाड प्रेम तुजवर
मनी प्रतिमा ही थोर
नाही मी प्रेम सौदागर
दे इशारा तू लवकर!
तुझ्या नजरेचा इशारा
आघात हा काळजावर
प्रेमात खरं खोटं जरूर
प्रेमाचे असे खुले द्वार!
नाजूक हात हे सुंदर
माझ्या प्रेमाची दोर
दिसतेस खूप तू सुंदर
प्रेमाचा कर स्वीकार!!
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर
=========