
लाटांच्या वाटा
उसळत्या लाटा
येती समुद्र किनारी
प्रश्न विचारी
मनाला||१||
लाटांचा स्पर्श
मनी आस जागवी
मार्ग दाखवी
जीवनात||२||
समुद्र किनारी
अगदी शांत बसावे
लाटांना पहावे
एकटक||३||
मनातील विचारांना
दिशा नवी मिळते
सार कळते
जीवनाचे||४||
लाटांच्या वाटा
देती नवे विचार
कर स्विकार
आव्हानांचा||५||
संकटात उभारण्याचे
लाटा देतील बळ
कष्टाचे फळ
मिळेल||६||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
=========