आत्मसन्मान

आत्मसन्मानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एक वेळा मरण स्विकारावे पण आत्मसन्मान विकू नये म्हणतात.आत्मसन्मान हाच आत्मविश्वासाचा मूळ धागा… जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, स्वतःचा आत्मसन्मान करते त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास प्रचंड असतो. अशा व्यक्ती जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यांना न डगमगता सामोरे जातात. एखादे अपयश जरी पदरी पडले तरी ते निराश न होता पुन्हा प्रयत्न करतात. स्वतः च्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची प्रवृत्ती अशा व्यक्तींमध्ये नसते.या व्यक्ती स्वयंमूल्यमापन योग्य पद्धतीने करू शकतात. स्वतःचे गुण दोषांची यांना पूर्ण कल्पना असते.. त्यानुसारच ते आपल्या कामाचा आवाका ठरवत असतात.अशा व्यक्ती ‘स्व’त्व किंवा ‘मी’त्व समाजासमोर मांडत नाहीत.

या व्यक्ती स्वतः बरोबर दुसऱ्यांवरही विश्वास ठेवतात. संशयी नसतात. स्वतः च्या आत्मसन्मानाबरोबर दुसऱ्यांचा स्वाभिमानही जपतात. स्वतःची चूक मान्य करून दुसऱ्यांना माफ करण्याचे सामर्थ्य हे ठेवून असतात.यांच्यामध्ये मित्रत्वाची, सहकार्याची भावना असते, विचार सकारात्मक असतात. आत्मसन्मानाचा विचार केला तर समाजात पुरूषांमध्ये तो जास्त जाणवतो… पण हा एक निव्वळ गोड गैरसमज कारण स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वाभिमान असतो. स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाबरोबर सहनशीलता असते तर पुरूषांमध्ये अहंकार असल्याचे जास्त प्रमाणात पहायला मिळते.. यात अपवाद ही आढळतात.कदाचित समाजाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अशा गुणांची विभागणी केली असावी.

पण स्त्री सहनशील म्हणून तिच्यावर चूका थोपवणे, चार माणसात अक्कल काढणे, अपमान करणे किंवा कमी लेखने यावर पुरूषांनी जरूर विचार करावा कारण ती सहन करत असते कुटुंब टिकवण्यासाठी.. ज्या स्त्रिया या गोष्टींना विरोध करून आत्मसन्मान जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते… बऱ्याच वेळा त्यांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले जाते…असो… स्वतःचा आत्मसन्मान जपणाऱ्यांनी दुसऱ्यांचा जपणे तितकेच आवश्यक.

कोणत्याही व्यक्तींची जीवनात काही तत्वे ठरलेली असतात आणि ती असायलाच हवीत. स्वतःचा आत्मसन्मान जपता आला पाहिजे. लाचारी, स्वाभिमानशून्यता यामुळे जीवनाला पिळपिळेपणा येतो. राजापुढेही न वाकणारे, सम्राटालाही मुजरा न करणारे, श्रीमंतांच्या नजराण्यांची तबके परत करणारे अनेक शूर सरदार, साहित्यिक, कलावंत इतिहासाला माहित आहेत. कोणीही कोणाला विकत घेऊ नये अथवा विकले जाऊ नये असं आपलं आयुष्य हवं..तरच आयुष्याला आत्मसन्मानाची झळाळी येते. आत्मसन्मान सांभाळणं म्हणजे अहंकार व्यक्त करणे नव्हे. अहंकाराला दर्प असतो तर आत्मसन्मानाला गंध असतो. स्वतःचा आत्मसन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles