नागपुरात केसीआर यांच्या उपस्थितीत उद्या कार्यकर्ता मेळावा

नागपुरात केसीआर यांच्या उपस्थितीत उद्या कार्यकर्ता मेळावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: भारत राष्ट्र समितीचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे उद्या दिनांक गुरुवार 15 जून रोजी नागपूर शहरात येत आहेत. राज्यातील पक्षांच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. के चंद्रशेखरराव यांचे गुरुवारी दुपारी एक वाजता शहरात आगमन झाल्यानंतर साई मंदिराजवळील विभागीय कार्यालयाचे ते उद्घाटन करतील. यानंतर दुपारी दोन वाजता सुरेश भट सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम होईल.

छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथील सभा गाजवणाऱ्या चंद्रशेखरराव यांनी उपराजधानीत मात्र शक्तिप्रदर्शन करण्याचे टाळले आहे. बालक एस सुमन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या टीमने नागपुरात ठाण मांडलेले असून विदर्भातील नेत्यांशी समन्वय साधला आहे. दस्तूर खुद्द राव हे विदर्भातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यापासून विदर्भासह अन्य नेत्यांशी त्यांनी संवाद साधला आहे. काही नेत्यांना खास हैदराबादला बोलवून त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे.

*वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेकडेही लक्ष*

तेलंगणा राज्याच्या मागणी दरम्यान त्यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले व त्यामुळे त्या दौऱ्यात ते विदर्भाबाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता विदर्भ वासियांना आहे. पूर्व विदर्भाचे समन्वयक ज्ञानेश वाकुडकर, माजी खासदार हरिभाऊ राठोड,समाजी आमदार दीपक आत्राम, राजू तोडसाम, वसंतराव बोंडे, चरण वाघमारे, निखिल देशमुख, जावेद हबीब, संजय बोरकर, मती तमन्ना आदींच्या नेतृत्वाखाली पक्षांचे झेंडे पोस्टर्स बॅनर द्वारे वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles