
नवीन मराठी शाळेत योगदिन उत्साहात साजरा
*_तब्बल तेराशे विद्यार्थ्यांनी केली योगासने_*
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे : दि. २१(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय योगदिनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत सुमारे तेराशे विद्यार्थ्यांनी शाळेच्या भव्य प्रांगणात एकत्रित योगासने करून योगदिन उत्साहात साजरा केला. शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. “शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी नियमित योगासने करावीत आणि मनाचे व शरीराचे आरोग्य जपावे” अशा शब्दात मुख्याध्यापक वाघ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ईयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे तेराशे वीस विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार परीपूर्ण योगासने केली आणि नियमितपणे योगासने करण्याचा संकल्प घेतला.
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱी व पालकांनीही या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. भाग्यश्री हजारे यांनी योगदिनाची माहिती सांगितली. रुपाली सावंत यांनी सूत्रसंचालन केले.मनीषा कदम,मीनल कचरे यांनी योगगीत गायले. योगिता भावकर यांनी आभार मानले. तनुजा तिकोने,धनंजय तळपे,सुषमा घडशी यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.