दिल्लीत लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा ‘आप’तर्फे निषेध

दिल्लीत लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा ‘आप’तर्फे निषेधपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आम आदमी पार्टी नागपूर द्वारे आज दिनांक 11/6/2023 रोजी केंद्र सरकारच्या लोकतंत्र विरोधी काळ्या अध्यादेशाच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली. ही महा रॅली श्री देवेंद्र वानखेडे व जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. यावेळी प्रामुख्याने नागपूर संयोजक कविता सिंगल, संघटन मंत्री शंकर इंगोले, उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी, सचिव भूषण ढाकुलकर, डॉ अमेय नारनवरे, काजी जी, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, नामदेव कांबळे, अजय धर्मे, अभिजीत जा, मनोज डफरे, युवा संयोजक श्याम बोकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

ही बाईक रॅली संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेपासनं सुरू झाली येथून संविधान चौक ते व्हेरायटी चौक ते झाशी राणी चौक ते मुंजे चौक पासून व्हरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर ही रॅली संपुष्टात आली. ह्या रॅलीमध्ये 500 हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभाग केला.

दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे , बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. बाईक रॅलीमध्ये आज आप स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंच ने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे श्री देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप श्री जगजीत सिंग यांनी केला.

आता अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुप्रीम कोर्टाने आप सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही ह्या अध्यादेशाच्या मार्गे बदली, नियुक्ती चे अधिकार मोदी सरकारने आपल्याकडे घेतले आहेत याचा काळी फीत लावून निषेध केला गेला. याप्रसंगी पार्टीचे शालिनी अरोरा मॅडम, अलका पोपटकर, आकाश कावळे, जॉय बांगडकर, हरीश भाऊ गुरबानी, आकाश वैध्य, प्रज्ञाजीत सोमकुवर, मोसिन खान, मकसुद शेख, सुमित बोरकर, संदीप कोवे, प्रकाश तिवारी, साहिल सडमके, संजय लेंढारे, सपन आवळे, अतुल मोठघरे, हेमंत बनसोड, अनिल बुरेवार, अग्नेस सेलबेस्टर, मृणाली वैद्य, श्री रोशन डोंगरे, डॉ .अमेय इ नारनवरे , श्री प्रदीप पौनिकर , श्री नरेश महाजन श्री स्वप्नील सोमकुंवर ,मोरेश्वर मौंदेकर, श्रीमती नीलम नारनवरे , माणशिंग अहिरवार,रवींद्र गिधोंडे,किशन निमजे ,विशाल वैद्य, पंकज मेश्राम , शुभम मोरे ,डॉ परिश भौतकर ,क्लेमेंट डेविड .
रविकान्त चौरसिया, सूचना गजभिए, सूरज गणवीर, किशोर डोंगरे, यश सल्वे, रोहित देश्भ्रतर, निखिल बागडे, बंटी जोसेफ, सुनील मैथ्यू, भावना गजभिए, संजय चाँदेकर, तुषार गेडाम, शैलेश गजभिए, किशोर मौंदेकर. जावेद मलाधारी,हिमांशु ताम्बे, असलम शेख़,निलेश वहाने, प्रमोद चौधरी, गीता मेश्राम,नाशिर शेख़, आदिल शेख़, चंदू कुंभारे, शिल्पा बागडे, आकाश कांबले, अजिंक्य, आकाश बागडे, श्रीमती कविता सिंह, सुहेल गणवीर, विकी आहुजा, अविनाश सोरदे, प्रणय गणवीर, राजेश सोरदे, शशांक बोरकर, प्रब्जोत बागडे, आर्यन डोंगरे, शुभम डोंगरे, शुभम सुखदेवे, इर्शाद मलाधरी, कार्तिक, मनोज प्रसाद, बाबा भाई, सोनू सैयद, राजेश खोब्रागडे, नितीन रामटेके, सुशांत पाटिल, नरेन्द्र माटे,मनोज डफरे,सचिन पारधी,सुषमा कांबळे,संजय जीवतोडे, उमाकांत बनसोड, विनायक पाटील,किशोर मसुरकरजी,निशांत चौधरी,चंद्रशेखर पराड,मोहोम्मद इलियास,रफिक भाई,स्मिता घोरपडे, महेंद्र घोरपडे, गणेश राऊत,अतिष तायवाडे,रोहित उंदिरवडे,शुभम पराळे,सुभाष भगत,नागसेन शेंदरे, प्रथमेश मेश्राम,प्रतीक भगत, विनोद अलमडोहकर, सुरेश खर्चे, शिरीष तिडके, अमित पिसे, राजेश गजघाटे, प्रमोद नाईक, मंगेश डांगरे, भरत जवादे, प्रमोद लढा, वैष्णवी ढाबरे, सुमित्रा मेंढे, सारंग मेंढे, गौतम कावरे, संजय गट्टूवार, प्रशांत मेश्राम, चमन बमनेले, संतोष गेडाम, रविद्र कुथे, मुकेश सेन, दिनेश वासू, निखिल गोसावी, विष्णू थोरात, कपिल भवरे, सुयोग सावते, गजेंद्र चंदेल, यश भालेराव, साहिल तेलंगे, सौरभ कांबळे, सुशांत ठाकरे, वेदांत पाठवावे, अनिश कथाने, आदेश फलक, हर्षल वानखेडे, चैतन्य गजभिये, मोहित राऊत, शुभम कांबळे, ऋषभ वाघमारे, प्रेमदास नाईक, पटेल काका, कुलदीप भालेराव, ऋषभ, पुष्पा बाई ढाबरे, धीरज बोरकर,पायल शेंडे, हितेश कांबळे, दुर्गेश खरे, जगदीश, दिलीप बिडकर, प्रताप गोसामी, शांतनू दुबे, पंजवानीजी, विशाल महजन, शशिकांत रायपूरेजी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles