
गोरक्षक सत्कार समारंभाचे आयोजन
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: गोशाळा महासंघ महाराष्ट्र व गोरक्षा स्थळी स्मारक समिती पुसद, जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित गोरक्षा स्थळी पूजन व गोरक्षक सत्कार समारंभ रविवार दिनांक 16 जुलाई 2023 रोजी दुपारी 12 वाजता श्री गजानन महाराज मंगल कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी एकबोटे, पुणे ,(संयोजक आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्ष अभियान) कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ. पंकजजी जयस्वाल, पुसद( जिल्हा संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शंकरजी गायकर ,मुंबई (राष्ट्रीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद) श्री एड मोतीसिंगजी मोहता , अकोला (अध्यक्ष गोशाळा महासंघ विदर्भ ) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. खासदार डॉ. अनिलजी बोंडे, अमरावती (राज्यसभा खासदार) मा. श्री. शेखरजी मुंदडा, पुणे (अध्यक्ष गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य) श्री सुनीलजी मानसिंगका , नागपूर (सदस्य – कामधेनु आयोग भारत सरकार ) श्री अशोकजी जैन ,मुंबई (अध्यक्ष _महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती महाराष्ट्र शासन) कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सुनील सूर्यवंशी , अमरावती (संयोजक- गोशाळा महासंघ महाराष्ट्र)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परम पूज्य डॉ. हेडगेवार जी यांनी जुलाई 1930 रोजी पुसद जिल्हा यवतमाळ येथे एका कसाया कडून गोमातेचे रक्षण करून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केले होते त्या ठिकाणी गोरक्षा स्मारक निर्माण व्हावे व गोरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या गोरक्षकांचा व गोशाळा ट्रस्टी संचालकांचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे
महाराष्ट्रात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या होत आहे खूप मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक गोवंश ची होत आहे गोवंशाची तस्करी अन्य राज्यात होत आहे.
ते थांबवण्या करिता अनेक गोरक्षक आपल्या जीवाची परवा न करता कार्य करीत आहे . गोमातेचे रक्षण करत करता वेळप्रसंगी अनेक गोरक्षकांवर हमले होतात . या सर्व गोरक्षकांना गोरक्षा कायदे ची योग्य माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन होणार आहे त्याच प्रमाणे गोरक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या गोरक्षकांचा सत्कार या कार्यक्रमात होणार आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10 गोरक्षक सहभागी होणार आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून 500 पेक्षा जास्त गोरक्षक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे
आज या प्रेस वार्तास डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. पंकज जयस्वाल, श्री रवी ग्यानचंदानी, श्री मनोज सरवैय्या, श्री वैष्णव ढोकणे, आधी उपस्थित होते.