हिंदराज ग्रुप’ ने साजरी केली आगळी वेगळी शिवजयंती

हिंदराज ग्रुप’ ने साजरी केली आगळी वेगळी शिवजयंती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: (जि.प्र.) येथील गंज पेठेतल्या मासे आळी परिसरात ‘हिंदराज ग्रुप’ हा शिवप्रेमी मंडळींचा समुह कार्यरत असून अनेक आगळेवेगळे उपक्रम राबवित असतो. त्यानुसार त्यांनी यंदाही शिवजयंती उत्सव असाच आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला.

उत्सव साजरा करताना जोरदार स॔गीताच्या तालावर मिरवणूक काढण्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह असतो. परंतु ‘हिंदराज ग्रुप’ च्या संयोजकांनी मिरवणुक आणि देखावा यामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्ण टाळून त्यावर होणार खर्चातून उद्यान विभागातील स्वच्छता दूत नरसम्मा धनगर, कमल शिंदे, शांताबाई कांबळे, कल्याणी नाईक, वैशाली पवार यांचा सत्कार केला. कार्यक्रमास उपस्थित निमंत्रितांना ग्रंथ भेट देऊन अगदी आगळयावेगळया पध्दतीने शिवजयंती
उत्सव साजरा केला.

राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेत प्रिया कोसुंबकर यांचे कार्यक्रमात घोड्यावरुन आगमन झाले. त्यांनी उपस्थित मुलांना संदेश देताना ‘स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आणि मातृभूमी विषयी आस्था तसेच समाजाविषयी प्रेम व देशभक्तीची भावना जपावी” असे सांगितले.

या कार्यक्रमात ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे यांनी लिहीलेल्या ‘रामायणाच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘हिंदराज ग्रुप’च्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. आबासाहेब अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी “किशोर” मासिकाची वर्गणी भरुन सभासदत्वं घेतले. “हिंदराज” ग्रुपच्या ध्वनी प्रदुषण विरहीत व सामाजिक बांधिलकी जपून साजरा केलेला शिवजयंती उत्सव स्तुत्य असल्याबाबत प्रसाद भडसावळे यांनी कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गणेश परदेशी, विनायक बंडा, हर्षल कोम्पेल्ली, परेश कल्याणी, संदीप चिलका, अक्षय जन्नू, आकाश श्रीमल, अक्षय दामणे, लखन बंडा या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मंडळातील तरुणांनी मर्दानी साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यास उपस्थितांची उस्फूर्त दाद मिळाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles