लोकशाहीसाठी आजही बोटाला शाईच

लोकशाहीसाठी आजही बोटाला शाईच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आधुनिक काळात सुधारणेची गरज; नवयुवकांच्या दृष्टीने जुनाट प्रथा

भंडारा : देशातील लोकशाही ७५ वर्षांची झाली आहे. मतदार प्रक्रियेत पूर्वीच्या तुलनेत अनेक सुधारणा झालेल्या आहेत. मात्र, सुरवातीच्या काळाप्रमाणेच आजही मतदाराच्या बोटाला शाई लावण्याची परंपरा आजही कायम आहे. आताच्या डिजिटल काळात युवा मतदारांच्या दृष्टीने जुनाट प्रथा आहे. त्यामुळे डिजिटल प्रमाणपत्र किंवा अन्य एखादा पर्याय निर्माण करण्याची सुधारणा करणे गरजेचे झाले आहे.
मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या आवडत्या उमेदवाराची निवड करणे हा लोकशाही शासन व्यवस्थेचा आत्मा आहे. सुरवातीच्या काळापासून आतापर्यंत या निवडणूक प्रक्रियेत कितीतरी सुधारणा करण्यात आल्या आहेत. मतदारांना फोटो ओळखपत्र, ईव्हीएम मशीनचा वापर, व्हीव्हीपॅट, आदर्श आचारसंहितेचे पालन, उमेदवारांच्या प्रचार खर्चावरील मर्यादा, पोस्टल बॅलेट, पारदर्शक पद्धतीने मतदान यासह दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुधारणा मतदान प्रक्रियेत केलेल्या आहेत. या निवडणुकीसाठी संपूर्ण देशातील प्रशासकीय यंत्रणा काटेकोरपणे नियम व कायद्यांचे पालन करून निवडणुकीची प्रक्रिया राबविते. त्यानुसार राष्ट्रीय, प्रादेशिक स्तरावरील राजकीय पक्ष आणि स्थानिक उमेदवार या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतात.

देशाचा विकास आणि सार्वजनिक यंत्रणांबाबत धोरण ठरवून त्याची अमलबजावणी करता यावी याकरिता देशातील सर्व नागरिक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करतात. त्यासाठी मतदार यादीतील नोंदीनुसार आपणच मतदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार, पॅन असे आठ प्रकारचे ओळखपत्र दाखविल्यावर मतदान करता येते. मात्र, मतदानाची संधी मिळताच बोटावर काळ्या शाईचा डाग लावल्या जातो.

बोटावरील हा डाग मतदान केल्याचे चिन्ह समले जाते. मात्र, देशात लोकशाहीची सुरवात झाली. त्यावेळी समाजातील बहुसंख्य मतदार हे अशिक्षित होते. त्यातही महिलांचे प्रमाण जास्त होते. ते सर्व मतदार शाईने अंगठ्याचा ठसा उमटवूनच आपण मतदार असल्याचे सिद्ध करू शकत होते. मात्र, आताच्या काळात अशिक्षित व्यक्तीला शोधणे अशक्यप्राय झाले आहे. मतदान केंद्रात जाणारे सर्व मतदार स्वाक्षरी करतात. अशावेळी मतदान झाल्याची ओळख म्हणून बोटावर शाईचा डाग लावण्याऐवजी डिजिटल प्रमाणपत्र किंवा इतर सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुधारणा निरंतर व्हाव्यात

विशेष म्हणजे संपूर्ण देशात कोविड-१९ मध्ये प्रतिबंधक डास देताना नोंदणीकृत फोन नंबरवर डिजिटल प्रमाणपत्र दिले होते. त्यावेळी कोविड लस घेतली किंवा नाही, हे शोधण्याकरिता कोणलाची बोटावर डाग लावले नव्हते. तेव्हा निवडणूक आयोगाने मतदारांचा कल जाणून घेत बोटावर शाई लावण्याऐवजी सुधारित नवीन पद्धत अमलात आणावी आणि लोकशाहीच्या सबळीकरणासाठी अशा सुधारणा निरंतर होत राहाव्यात.

सेलिब्रेशनची संधी मिळावी

लोकशाहीतील निवडणुकीचा आत्मा मतदान आहे. आताच्या नवीन मतदारांच्या हातातील मोबाईल फोनमुळे ‘ते करलो दुनिया मुठ्ठीमे’ अशा अविर्भानेच कोणतेही कामे करतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही कामासाठी सेलिब्रेशन ‘मस्ट’ आहे. अशावेळी मतदानात सहभागी झाल्याचे फोटो फेसबुक आणि व्हॉटस्‌ॲप स्टेटस्‌वर ठेवले तर हरकत काय आहे? विशेष म्हणजे देशभरातील संपूर्ण यंत्रणा राबविण्याऐवजी निवडणूक आयोगाने आधार लिंक असलेल्या प्रत्येक मोबाईल नंबरवरच विशिष्ट कालावधीत मतदान करण्याची संधी दिल्यास या किचकट प्रक्रियेवरील बऱ्याच खर्चात कपात करता येईल.

मतदान केंद्रात गेल्यावर आपले ओळखपत्र पाहून संबंधित कर्मचारी मतदार यादीतील आपल्या नावासमोर खूण करतात. त्यानंतर त्या व्यक्तीचे मतदान झाले असे समजले जाते. त्यामुळे बोटावर शाईचा डाग लावण्याला काहीच अर्थ उरत नाही.

लोकेश मेश्राम, उपसरपंंच, भोजापूर.

आम्ही कितीतरी निवडणुकीत मतदान करून बोट काळे केले आहे. परंतु, नवीन मतदारांना ही प्रथा जुनाट आणि अनुपयुक्त वाटते.

गणेश बानेवार, राकॉं पदाधिकारी, भंडारा._

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles