‘रंजित वासनिक’ यांना प्रा. शा. कासलीतर्फे बदली झाल्याने निरोप

‘रंजित वासनिक’ यांना प्रा. शा. कासलीतर्फे बदली झाल्याने निरोप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आंतरजिल्हा बदली झाल्याने ग्रामस्थ पालक व विद्यार्थी भावूक_

कोपरगाव: अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जि.प. शाळा कासली, केंद्र दहिगाव येथे कार्यरत असलेले सहशिक्षक रंजित वासनिक सर यांची मागील महिन्यात जिल्हा परिषद अहमदनगर येथून जिल्हा परिषद भंडारा येथे आंतरजिल्हा बदली झाल्याने आज (दि ६) एप्रिल २४ रोजी प्रा. शा. कासली येथे सरांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम शा. व्य. समिती व समस्त शिक्षक वृंद यांच्या वतीने संपन्न झाला.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत मलिक, उपाध्यक्ष, प्रकाश मलिक, सर्व सदस्यगण शिक्षणप्रेमी दत्तूभाऊ मलिक, ग्रामपंचायतचे विष्णू सुबे तसेच ग्रामस्थ, शिक्षक बँकेचे चेअरमन जेजुरकर, शाळेचे मुख्याध्यापक राऊत ज्ञानेश्वर सर, पदवीधर शिक्षक काळे सर, पदवीधर शिक्षक मोरे योगेश सर, वायळ अभिजित सर, गायकवाड सर, सदगीर सर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

रंजित वासनिक सरांचा याप्रसंगी शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थी यश मांढरे, हर्षल मलिक, तन्वी मलिक, सार्थक जमधडे वर्ग १ ते ७ च्या या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, निसर्गचित्र व साईबाबा यांच्या प्रतिमा भेट म्हणून दिल्यात.

निरोप समारंभाप्रसंगी सत्कारमूर्ती रंजित वासनिक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपले अनुभव मांडले. ते म्हणाले, “मी या शाळेत फक्त ८ महिने काम केले, पण मला या शाळेतून खूप काही शिकायला मिळाले. मला आजही शाळेचा पहिला दिवस १५ जून आठवतो मी शाळेत आलो आणि शाळेतील मुलांची शिस्त मुलांनी इंग्रजी मधून घेतलेला परिपाठ मी हे सगळे बघून भारावून गेलो. शाळेतील सर्व माझे सहकारी यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे सहकार्य केले व वेळोवेळी मदत सुद्धा केली.’

पुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘माझ्याकडे इयत्ता १ ली व इयत्ता २ री असे दोन वर्ग आले व मी त्या मुलांना ज्ञान ज्ञानाचे कार्य सुरु केले व मी मुलामध्ये रमत गेलो व हळूहळू मुलाची आवड निर्माण झाली. मुलं आणि मी अभ्यासात गुंतून जात होतो. मुलांना मंथन परीक्षेत बसविले ते चांगल्या मार्कांनी पास सुद्धा झाले. पालकांनी सुद्धा मला वेळोवेळी सहकार्य केले. मला फोन करून सुद्धा मुलांचा अभ्यासाविषशी विचारायचे मी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मला त्या शाळेत ८ महिने कसे निघून गेले ते कळाले सुद्धा नाही. अशाप्रकारे आपले मनोगत मांडतांना सर्व ग्रामस्थ पालक व विद्यार्थी भावूक झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles