बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : सत्य तेच खरे?🥀*
*🍂बुधवार : १०/ एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सत्य तेच खरे?*

साळसूदांच्या या जगात
गंगाच उलटी वाहते
असत्याची चलती येथे
सत्य मूग गिळून बसते

स्वार्थाच्या या बाजारात
मुखवटेच हो फिरतात
मुखवट्याआडचे चेहरे
कधी कोणाला दिसतात?

सत्तेपुढे न चाले शहाणपण
बळी दुबळ्यांचा कान पिळी
तापल्या तव्यावर भाजती पोळी
चोर सोडून संन्याशाला सुळी

जातीयतेचे बीज विषारी
वृक्ष याचा बनला काटेरी
मतलबींची इथे मांदियाळी
धर्माचे राजकारण जहरी

माणुसकी आता लोपली
सावलीही परकी जाहली
नोटांभवती फिरु लागली
नाती तरी कुठे उरली?

शिक्षण झाले श्रीमंतांची मक्तेदारी
गरीबांची का वाया हुशारी?
जगाचा पोशिंदा अर्धपोटी
खोट्यांची चाले इथे शिरजोरी

कसे म्हणावे सत्य तेच खरे?
हा प्रश्न जन सामान्यां समोर
तरी सत्याचाच होईल विजय
खोटे कधीतरी येईल बाहेर

माणुसकीची जाण ठेवून
मार्ग सत्याचा तू स्वीकार
सातत्याने मनी भान ठेव
होणार सत्याचाच जयजयकार

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*खरे तेच सत्य*

खरे तेच सत्य /असती सर्वदा//
मार्ग तोची सदा/ अनुसरा //

कधी कधी वाटे/ खोटा होतो राजा/
खरा भोगी सजा /जीवनात //

खोटे कधी कधी /वाटे जरी बरे//
आयुष्या ना पुरे /कदापही//

सत्य असत्याची/ शहानिशा थोडी//
करा एक घडी /आधीच रे//

वाटे मार्ग कटू/ सत्याचा हा जरी/
देई फळ तरी/ गोड ची रे //

सत्य बऱ्याचदा / परेशान जरी /
नाही होय तरी /पराजित//

काहीही ना ऐकू/ उगाच कुणाचे/
हलक्या कानाचे /बनू नये//

सत्यची अनंत/ असे अमर्याद /
घडे सुसंवाद /सर्वकाळ //

सत्याचीच कास / जो जो मनी धरी/
पाटी त्याची कोरी / कदाचिना //

धरा सत्य संग/ हृदयी तरंग /
सदैव आनंद /वसतसे //

*शितल भोपाळे (अथाटे)*
*अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे…?*

खोट्या मुखवट्याआडचे, कसे जाणावे चेहरे
सुहास्य वदनी गोड वाणी, भाव ह्रदयात गहरे..//

असण्या दिसण्यात भेदाभेद, हेच पेच का बरे
म्हणूनच तर प्रश्न पडतात, कसे सत्य तेच खरे.?

विसंगत असे कृती मात्र, देतात लुभावणे नारे
दिवसा ढवळ्या दाखवतात, अस्मानातले तारे.. //

नदी किनारी बक समाधी, माशास कळेना रे
मरण चोचीत पक्कड भारी, सुटका मिळेना रे.. //

नको नको रे भुलू मना, साधू वेशात भोंदू फिरे
गारगोटीच्या खड्याला, नको समजू कधी हिरे.. //

पारध होण्या आधीच पारख, खरे खोटे मोहरे
गारद होशील हकनाक, सावध असणेच बरे.. //

हा सूर्य अन् हा जयद्रथ, ही कृष्णनिती शिक रे
सत्य निर्भिड स्वयंभू, कुणा घालू नको भिक रे.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना आज रात्री ९.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

चिमुकल्याच्या पाठीवर
मणभर ओझे
मोठ्या दप्तरात
आहे तरी काय तुझे ॥१॥

वह्या पुस्तकांचा ढीग
लागतो का रोज
सत्य तेच खरे आहे
सांगेल तोच गुज ॥२॥

पाठीवर भूगोल
घेऊन फिरतो
पृथ्वीला गोल गोल
प्रदक्षणा मारतो ॥३॥

शिकणे म्हणजे
दमणे नाही
सत्य तेच खरे आहे
बोलणे हे सोपे नाही ॥४॥

शास्र भाषा म्हणती
कसा चढणार गड
तुझ्या पेक्षा तुझे
ज्ञान झाले जड ॥५॥

गणिक बसले
दप्तरात दडून
सत्य तेच खरे आहे
काढ तूं मोडून ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे…?*

मुखवट्याआडच्या जगाला
नाहीच कधी सरावलो……
जे होते मनात जेव्हा कधी
सरळ बोलून मोकळे झालो…
शब्द नाही जरी उमटले मुखातून
पण भाव चेहऱ्यावर तेच आले…
अंतरीच्या खळखळाटातून
प्रामाणिकतेचे मोतीच आले…
खुश्शाल म्हणावे अबोल शिष्ट
मात्र कारणाविणं न बोलता आले
उगाचच तोंडदेखले गोड बोलून
लाळघोटेपण नच करता आले…
परिस्थितीनुरूप जगताना कधी
डोळे आसवांच्या धारांत न्हाले
सत्य हेच खरे ? असे म्हणतानाही
सत्याचेच मुखवटे बघत राहिले……

*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*……..सत्य हेच खरे?……..*

मानवाचे जन्म आणि मरण
अजून कुणास कळले नाही..
स्त्रीगर्भाच्या निर्मितीचे कारण
अजून ही कुणाला उमगले नाही..

कोणी पैश्यासाठी दिवाणे तर
कोणाला सौंदर्याचे मोठे गर्व..
सगळेच राहून जाते इथेच
जेंव्हा संपते जीवनाचे पर्व..

हे माझे ते माझे करता करता
जमवत असतो जे गाठोडे मायेचे..
चीतेवर जाता कफन ही ठेवत नाही
आलो खाली हात तसचे आहे जायचे…

जेव्हा मृत्युची भरते घटिका
ओढून नेई मनुजा त्या स्थळी..
जो कोणाचे कधी ऐकत नव्हता
तोच पडतो कसा प्रलोभनाला बळी..

मृत्यूनंतर या मानवी देहाची
रहात नाही किंमत मुळात..
कधी त्याची लावयची विल्हेवाट
हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात..

विज्ञान किती ही प्रगत झाले
दुर्धर आजारांवर निदान शोधले..
पण मृत्युनंतर जीवनाचे कोडे
कोणास ही ना अजून सुटले..

तरीही भौतिक सुखाच्या मागे धावतो
मृत्युपश्चात काय सोबत जाते सांगा बरे..
कळते पण वळत नाही मानवा तुला
जन्मलेल्याला मरण सत्य हेच खरे?…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

कटूसत्य जीवनाचा आधार
देवा मानतो तुझेच आभार!

सत्य तेच खरे जीवनभर
शेवटी प्रयत्नातून परमेश्वर!

रितिभाती या परंपरा सुंदर
सदभावनांचा करावा आदर!

भारतीय संस्कृतीच दमदार
पाठीशी उभी वेळीच खंबीर!

सत्य युगाचे महापुरुष थोर
कलियुगाचा कली भयंकर!

बदलते जीवन बदला विचार
सत्य तेच खरे आयुष्यभर!

रामायण हे मार्गदर्शन थोर
घडू नये महाभारत घरोघर!

सत्य या विश्वाचा आधार
उत्तम विचार करा स्विकार!

उघडा डोळे पहा समोर
सत्याला फुटावा पाझर!

सत्य जपावे हेच निरंतर
मनशांतीचा दावा बरोबर!!

*श्री अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे ?*

असत्य कितीही टाहो फोडो
अनैतिकतेची नशा कितीही चढे….
साम दंड अर्थ भेदाची न भिती
अंतः सत्य तेच खरे…

अराजकतेने अमानुषतेने
सत्य हे असत्याच्या पायदळी तुडे…
अखेरच्या श्वासापर्यंत ची लढाई
सदैव होई सत्य तेच खरे…

आज लपवता अपराध होई मोठा
कबुली द्यावी प्रामाणिकपणे…
माणुस बनुनी जरा जपा माणुसकी
कारण शेवटी होई सत्य तेच खरे….

असत्याची दोलायमान दुनिया
एका क्षणात पत्त्यांचा डाव उडे…
वज्राचे ही घाव सोसूनही
कायम सत्य तेच खरे…

खोटेपणा असो ढोंगीपणाचे
चार दिवसांत पितळ उघडे पडे…
अग्नीत कणक आणखी उजळे
सत्य हे अखेर सत्य तेच खरे…

*सौ.सुचिता नाईक,नांदेड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे*

सत्य तेच खरे मानुनी
जीवन होईल सुखकर
सत्याला कधीच नसते मरण
अमर असते सत्य चिरंतर

विश्वास लोकशाहीचा आत्मा
सत्यभाव सत्कर्म सत्य विचार
इतिहास वर्तमानाची सांगड घालून
जीवन फुलवत असते सुंदर

नैसर्गिक सौंदर्य हा अलंकार
बुद्धिमत्ता सत्य तेच खरे
क्रोध मोह माया अविश्वास
बाकी सर्व क्षण सत्तेची बरे

सत्य हे विश्वासाची पहिली पायरी
परंपरा संस्कृती जपावी
सत्यासारखा उत्तम मार्ग
मनाला मनशांती असावी

कान डोळे उघडून करावे काम
मीपणा सोडून द्यावा लागेल
विश्वासाचा मार्ग शोधून
तरच सत्य तेच खरे होईल

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे ?*

असे जण पाहिले मी,
तोंडावर साखर पेरणी करणारे
शिव्यांची लाखोली होताच पाठमोरे

असे जण पाहिले मी,
मुंगी होऊन साखर खाणारे
काम होताच गिधाडासम तुटून पडणारे…

असे जण पाहिले मी,
आप्ताच्या दोषात डोळे झाकणारे
इतरांच्या गुणातही खडे शोधणारे

असे जण पाहिले मी,
उजेडात रामनाम जपणारे..
तमाच्या कुशीत वासनेत तापणारे..

असे जण पाहिले मी,
फोटो पुरते सत्कर्म करणारे..
वास्तवात,दीनांना ओरबाडून खाणारे

एवढे पाहूनही कसे म्हणावे मी,
जे दिसते डोळ्यांना सत्य तेच खरे?
वास्तवात,आम्हास दाखविले जाते,
तेच वाटते आम्हास बरे… !!
भोळ्या भाबड्या बुद्धिशी खेळण्याचे
हे चतुरी फासे सारे. ..
मानवा आता तरी ओळख बेगडी चेहरे…
ते बेगडी चेहरे

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे* ?

सत्य तेच खरे! बाकी मिथ्या बरे !!
क्षणच सत्याचे ! तारीतसे !!

क्रोध मोह माया! बिघडवी काया !!
पार करू न दे ! जीवनास !!

भवसागर हा ! अथांग पसारा !!
अडके मानव ! न निघण्या !!

मनावर ताबा ! मिटे अंध:कारा
जागवी मानवा ! त्यागी भाव !!

सत्याची पुजारी ! राहू दे करणी !!
‌वाणी करणी ती ! एक असो !!

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे?*

सत्य तेच खरे आहे
आत्मा अमर चिरंतन
बाकी सर्व असे मिथ्या
क्षणभंगुर हे जीवन

शरीर एक वस्र आहे
जाणार आहे मातीत
पंचतत्वात मिसळून
होणार त्याची क्षती

नव वस्र धारण करून
आत्मा पुन्हा अवतरतो
पूर्वजन्म कर्मानुसार
जीवन ईश्वर ठरवितो

नाशीवंत देहासाठी
नको खोटे नाटे सूत्र
सत्य तेच खरे आहे
बाकी जीवन एक तंत्र

सत्कर्म,सत्धर्म,सत्यभाव
आचरावा अपुले जीवनी
नाही होणार दुर्गती अन्
मानवी जन्मास मिळेल सद्गती

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे?*

सत्य तेच खरे माना,
जीवन जगा अतिसुंदर,
यशप्राप्ती नक्कीच होते,
प्रयत्न ठेवा सदा निरंतर ||१||

झाली चूक कबूल करा,
माफी मागा पाय धरा,
सत्य काय ते लपवल्यावर,
खोट्याचाच वाढेल भारा||२||

सत्य कधीच लपत नाही,
खोटे कधीच पचत नाही,
खोट्याच्या कपाळी गोटा,
चारित्र्याचा होईल तोटा||३||

सत्याचा प्रवास खडतर,
खोट्याची वाट सुखकर,
सत्य होईल सन्मानपात्र,
खोटे आहे भयाचा पुत्र||४||

सत्य तेच खरे मानून,
सत्याचीच कास धरा!
सत्याचाच वाटसरू
समाजात शोभतो खरा||५||

*सौ.शारदा राहुल शिंदे*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे?*

सद्सद विवेक बुध्दीने
विचार नेहमी करावा
शेवटी सत्य तेच खरे?
सत्याचा मार्ग निवडावा

महात्मा फुलेनी केला
भांडाफोड व्यवस्थेचा
उलगडण्या सत्य सारं
शोध घेत सत्यधर्माचा

स्थापिला ज्योतीरावांनी
सत्यशोधक समाज धर्म
वंचित होते हक्कापासून
जानिले होते तयांनी मर्म

भरडल्या जाई शेतकरी
स्त्रिया,पिढीत दलित वर्ग
जाच जुलूम अन्यायाला
वाचा फोडी एकमेव मार्ग

सत्य तेच खरे सांगितले
करण्या गुलामगिरी मुक्त
शिक्षणाचा पाया रोवला
ज्ञान प्राशन करी मनसोक्त

तोडी तडातड साखळदंड
सत्याची कास धरली मनी
झुगारीले गुलामगिरीला
सत्य तेच खरे घेत जाणुनी

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿
*सत्य तेच खरे ?*

सत्य हेची बाळगावे मनी,
सत्याचा होतोय विजय तोच,
खरा ईश्वररूपी देव जपावा,
सत्याचा होते जय ,
सत्य तेच खरे?..,…

हि दुनिया आहे वेडीवाकडी,
खिचतात पाय नको जाऊ तु,
त्या वाटेने चिखलात फसशील,
स्वतःच मन असावं स्थिर,
सत्याचा होते जय,
सत्य तेच खरे?……..

काच खळगे सांडले वाटेवरती,
काढु कशी वाट मी बोचतील
काटे, सरळ सोपा मार्ग नसतो,
कठिणातून सोपं करणं हाती,
सत्याचा होते जय,
सत्य तेच खरे?………

शुन्य होऊनी जगावं शुन्यातून,
आकडेवारी काढावीत त्यातून,
नको डगमगु जीवनाचे सार्थक,
खोट्या वाटेने जगशील जीवन,
व्यर्थच, सत्याचा होते जय,
सत्य तेच खरे?…….

खरे बोलावे, सत्याने चालावे,
खोट्याची संगत सत्याचा शोध,
खोट लपत नाही आज ना उद्या,
सत्याचा होते जय, सत्य अंधारात,
लपत नाही उजेडात दिसते,
सत्य तेच खरे?

*सौ.नंदा नथ्थुजी कामडी चंद्रपूर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁🎋🍁➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles