डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला?

डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती संपूर्ण भारतात हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. खरे पाहता बाबासाहेब है कुण्या एका जातीचे, धर्माचे नव्हतेच. ते सर्व विश्वातील जनसामान्याचे होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘बौद्ध’ धर्मच का स्वीकारला? याबाबत नव्या पीढीला अवगत व्हावे म्हणून हा शब्दप्रपंच. खरे पाहता, हिंदू धर्मात दलितांना मिळणारी हीन वागणूक, जातीयता, अस्पृश्यता, विटाळ, कर्मकांड ह्याने दलितांचे होत असलेले अधःपतन याला कारणीभूत होते. हजारो वर्षाची गुलामगिरीच्या जोखडातून सोडवण्यासाठी एका अशा धर्माची आवश्यकता होती, जो मानववादावर आधारित असून त्यात शांती अहिंसेच्या मार्गाने समाजाचे उत्थान करता येणे शक्य होते. या कसोटीवर ‘बौद्ध’ धम्म खरा उतरला. तो एक आदर्शवादी, अहिंसावादी, वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेला, तत्वज्ञान आणि तर्काच्या पायावर उभा असलेला धम्म आहे, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यासाअंती बौद्ध धम्माचा आपल्या अनुयायांसोबत स्वीकार केला

“मी हिंदू धर्म जरी सोडला असला तरी हिंदू धर्माचा परीघ मात्र ओलांडलेला नाही.” या वाक्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात किंवा पुस्तकात खरंच उल्लेख केला आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? कोणत्या कारणांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला? चीनमध्ये बौद्ध धर्म कसा पसरला? गौतम बुद्धांनंतर बौद्ध धर्मात हीनयान आणि महायान असे पंथ का निर्माण झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये आपल्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पण तत्पूर्वी त्यांनी सपत्नीक हा धर्म स्वीकारला होता.

अस्पृश्यांना सन्मानाने वागणूक देण्यास इथला हिंदू अद्यापही तयार नाही, तसेच, त्यामुळे हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांचा उत्कर्ष कधीही होणार ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार केला होता. अनेकांना डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्म विरोधी वाटू शकतात, परंतु ते खरे नाही. प्रत्यक्षात हिंदू धर्माने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाचा प्रतिकार आंबेडकर करत होते. आंबेडकर नव्हे तर, ऐतिहासिक हिंदू धर्म व हिंदू समाज अस्पृश्यांच्या व आंबेडकरांच्या विरुद्ध उभा होता. आंबेडकरांनी याचाच विरोधात बंड केले तथापि ते धर्माचा पोकळ अभिमान असणाऱ्या हिंदूना रुचले नाही व त्यांच्या मनात आंबेडकरांबद्दल द्वेष निर्माण झाला. आंबेडकरांनी हिंदू धर्मात विषमता आहे, त्यात समतेला थारा नाही असे म्हणत हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या जवळपास सर्वच प्रमुख धर्मांचा अभ्यास केला होता, त्यात ख्रिश्चन धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, शीख धर्म, हिंदू धर्म, जैन धर्म आदींचा समावेश होता. परंतु बाबासाहेबांना बौद्ध धर्मा खेरीज इतर धर्म ईश्वर व मोक्षाच्या गोष्टी करणारे आढळले, तर बौद्ध हा ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा व मनुष्याला केंद्रबिंदू मानणारा होता. तसेच स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे त्यांना केवळ बौद्ध धर्मातच गवसली.

ही प्रमुख तीन तत्त्वे त्यांना धर्मात अपेक्षित होती. यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी विदेशांत जाऊन अनेक जागतिक बौद्ध परिषदांमध्ये सहभाग घेतला, भारतीय गणराज्य मध्ये बौद्ध चिन्हांना निश्चित दर्जा मिळवून दिला. अर्थात बाबासाहेबांच्या मागे कोट्यवधी लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असे काही झाले नाही. उत्तरेत अरुणाचल, सिक्कीम, लडाख, दार्जिलिंग या भागात जे बौद्ध आहेत त्यांचा आणि नवबौद्धांचा काहीच सामाजिक संबंध नाही. ही जुनी बौद्ध मंडळी साधारण वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास आहेत. सुमारे पासष्ट लाख लोक जे इतर भारतात म्हणजे मुख्यत्वे महाराष्ट्रात आहेत ते डॉ. आंबेडकरांच्या मागे जाऊन बौद्ध झालेले आहेत.

संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध
७३८५३६३०८८
marathicheshiledar6678@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles