भेद मिटवू; पांडुरंग घोलप

भेद मिटवू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भेद मिटवू चला सारे
नकोत कलह हेवेदावे
प्रेमाचे घालूनी बंधन
मतभेद दूर व्हावे ||१||

ऋणानुबंध जपूया आपले
आता मनमनांतून आपण
सहृदय देऊया चला आता
एकमेकांस अलिंगन ||२||

भेदाची भिंत उभी करावी
कशास आपल्याच भोवती
आपणच जर आहोत
एकमेकांचे नित्य सोबती ||३||

गैरसमज करील विनाश
आपल्यातील नात्यांचा
भेद मिटवू चला तर मग
विजय होईल सत्याचा ||४||

मतभेद नको,नको असूया
नकोच वृथा अभिमान
भावनांचा आदर करू चला
राखू परस्परांचा मान ||५||

भेद मिटवू आपापसातील
चला सारे येऊया एकत्र
गळाभेट ही सार्थ करील
आपल्यातील अतूट मैत्र ||६||

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles