२५० व्या जयंती निमित्त श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना अभिवादन

२५० व्या जयंती निमित्त श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर,पुणे

पुणे: दि.१८ एप्रिल १७७४ बुधवार, रोजी म्हणजेच, मराठी पंचांगानुसार जयनाम संवत्सर , अधिक वैशाख, शुद्ध सप्तमी शके १६९६ या तिथीला पुरंदरगडावर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला. आज त्यांची २५० वी जयंती. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन व पुण्यस्मरण विश्वस्त,श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग, पर्वती व कोथरुड त्यांच्या वतीने करण्यात आले.

सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतील “खडर्याची लढाई” प्रसिध्द आहे. दि. १२ मार्च १७९५ ला निजामाचा संपूर्ण पराभव करणारी ही लढाई ईतिहासात मराठ्यांच्या विजयाची द्योतक आहे, अशी माहिती ईतिहास अभ्यासक व श्री. देवदेवेश्वर संस्थान सारसबागचे विश्वस्त श्री. जगन्नाथ लडकत यांनी दिली.

पुण्याच्या सारसबागेतील प्रसिध्द तळ्यातल्या श्री गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली केली होती. त्यांचे
आराध्य दैवत सिद्धिविनायकाचे हे सुंदर भव्य मंदिर आजही हजारो भाविकांच्या गर्दीने कायम गजबजलेले असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles