ईटुकल्या पिटुकल्यांचे नाटकबिटक’; सुट्टीतल्या अभिनय शिबीरांची धमाल

‘ईटुकल्या पिटुकल्यांचे नाटकबिटक’; सुट्टीतल्या अभिनय शिबीरांची धमाल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे: उन्हाळी सुटी आणि बाल रंगभूमी याचे अनोखे नाते आहे. सुट्टीत बालनाट्य शिबीरे घेणारी काही नाटकमंडळी वर्षानुवर्ष हे काम निष्ठेने करीत आहेत. मुंबईच्या “माता अनुसूया प्राॅडक्शन” या संस्थेच्या वतीने यंदा पुणे शहराच्या सदाशिव पेठ, कोथरूड, भूगाव अशा विविध भागात लहान व मोठ्या वयोगटातील मुलांचे अभिनय प्रशिक्षण शिबीरे घेण्यात आली.

या शिबीराच्या समारोपात “जंगली बाणा”, “निंज्या टाॅम-डोरेमाॅन-भीम”, “हॅपी बर्थ डे टू यू” अशा बाल नाटिकांचे प्रयोग भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व, टिळक स्मारक, यशवंतराव चव्हाण आणि आण्णाभाऊ साठे सभागृह अशा पुण्यातील विविध नाट्यगृहांमध्ये सादर करण्यात आली.

ईटुकल्या पिटुकल्यांच्या नाटुकल्यांनी उपस्थित बालगोपाळांचे धमाल मनोरंजन केले. ही गंमतशीर बालनाट्ये दाखवण्यासाठी आपल्या छोट्या सेनेला घेऊन खास उपस्थित राहीलेले पालकही आपले वय विसरून या हास्यकल्लोळात बुडून गेलेले दिसले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles