‘शाळापूर्व तयारी प्रशिक्षण’ जि प.प्रा.शा. अर्जुनी/मोर. येथे संपन्न

‘शाळापूर्व तयारी प्रशिक्षण’ जि प.प्रा.शा. अर्जुनी/मोर. येथे संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया/अर्जुनी/मोर: अर्जुनी/मोर केंद्रातील शिक्षकांची सत्र २०२४-२५ शैक्षणिक सत्राची’शाळापूर्व तयारी प्रशिक्षण ‘ दि. १६/०४/२०२४ रोज मंगळवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अर्जुनी/मोर क्र-१ येथे मुख्याध्यापक लीना ब्राम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री.एस.एम.भैसारे केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

याप्रसंगी केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, सर्व व्यवस्थापणेतील कार्यरत पदवीधर शिक्षक ,अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक उपस्थित होते .शिक्षण परिषदेमध्ये सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या भूमिकेवर ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे व त्याच्या पालकांच्या सहाय्याने बालकांचा विकास साधण्यासाठी शिक्षक व अंगणवाडी सेविकेचा सक्रिय सहभाग विषयक माहिती केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी प्रस्ताविकातून व्यक्त केले.

सदर शाळापूर्व तयारी प्रशिक्षण विषयावर सुलभक नरेंद्र बनकर सर जि.प.प्रा शाळा, अर्जुनी/मोर.क्र.१, व इंदिरा महादने, जि. प.वरिष्ठ प्राथ.शाळा,अर्जुनी/मोर क्र.२ यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , गोंदिया द्वारे राबवयाच्या उपक्रमांची माहिती दिली. सुलभक यांनी चर्चात्मक पध्दतीने व प्रात्यक्षिकरित्या विषयाचे सादरीकरण केले व उपस्थित सर्व शिक्षकांनी, अंगणवाडी शिक्षिका यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

सदर शाळापूर्व तयारी प्रशिक्षण व्यवस्थापक तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अर्जुनी/मोर चे शालेय प्रशासक मुख्याध्यापक सरिता घोरमारे यांचे उत्तम सहकार्य लाभले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन इयत्ता ३ रीचा विद्यार्थी अर्णव डोंगरवार यांनी केले तर उपस्थित सर्वाचे आभार नमिता लोथे यांनी मानले. शेवटी वंदेमातरम गीताने प्रशिक्षणाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles