थापाड्या
थापाड्या असतो
आपल्याच कोषात
हळुच अडकतो
कल्पनेच्या बुरख्यात ॥१॥
थापावर थापा
मारून होतो
नामानिराळा बेटा
दूरून मजा पहात तो ॥२॥
काळ्याला पिवळ
नी पिवळ्याला काळ
मिरवत घालवतो सारावेळ
जातो लोटून कैक काळ ॥३॥
फुसकी बातमी
ऐकायला नसतो
कुणी आसपास नेहमी
कसून शोध घेत असतो ॥४॥
थापाड्याला कोण
जवळ नाही घेत
दिसताच तो सारेजण
पळतात मागोवा घेत ॥५॥
नीला पाटणकर,शिकागो
=======