मतदाता मी
लोकांच्या लोकशाहीचा
जल्लोष चालतोय देशभर
पंचवार्षिक निवडणूकीत
झुंबड नेत्यांची मणभर
बाबासाहेबांच्या संविधानाचे
प्रजासत्ताक राष्ट्र हे आपले
गरीब श्रीमंत सार्वभौम सारे
अधिकार सर्वांना समान दिले
मतदाता मी सजग नागरिक
हक्क कर्तव्य हे बजावणार
या देशाच्या लोकशाहीचा
सजग प्रतिनिधी निवडणार
स्वाभिमानी मी मतदाता
ना विकणार ना झुकणार
संविधानाच्या अधिकाराने
भल्याभल्यांना झुकवणार
हक्क अधिकार ज्ञात जसे
कर्तव्यांची जाणीव असावी
जबाबदार नागरीक भारताचे
सजगता सर्वांच्या मनी असावी
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=============