जीवनपट

जीवनपट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धारातीर्थी पडला राजा
हा डाव राहिला अधुरा
सरसावली आता राणी
घेण्या खांद्यावरती धुरा…

राजावाचून राज्य राखू
उभी पटावरती थाटात
दिली उडवून खळबळ
प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात..

आव नव्हता फुकाचा
दाखवी करारी बाणा
मदार ठेवे सैन्यावरती
ह्रदयात स्मरला राणा…

चाल तिरकस उंटाची
आखली चतुर निती
प्यादे सरकवी रक्षणा
नच बाळगता भिती…

सरळमार्गी धीमी गती
आडवे उभे हत्ती ठाम
डावे उजवे अडीच घर
घोडे फेकून साधे काम..

गाफील ठेवूनी शत्रूला
आमिष दावी कमाल
धूर्त फसव्या चालीनेच
चकवा चकवी धमाल…

कधी समंजस बचाव
ना मानी न कदापी हार
कधी त्वेषाने आक्रमण
कडे भेदून घुसे आरपार..

घेवू द्या परीक्षा नियती
ठाण मांडले पटावरती
राज्य राखण्या सुरक्षित
देईन “चेक” हुकमी अंती…..

वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles