माझी पाककला
मल्टी डाळ फुंडके
साहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी तुरडाळ, मुगडाळ, मटकीडाळ, चनाडाळ, मसूरडाळ, एक वाटी चिरलेला कांदा, पाच ते सहा लसण पाकळ्या ,एक चमचा तेल, पाचसहा हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, जीरे, मोहरी, एक वाटी चिरलेली कोथिंबीर
कृती: सर्व डाळी पाण्यात रात्रभर भिजत घाला. स्वच्छ धुवून निथळत ठेवा. मिक्सरमध्ये मिरची, लसण घालून फिरवून घ्या. त्यात मीठ, हळद घाला. नीट कालवून छोटे गोळे बनवून वाफवून घ्या. कढईत तेल घाला. जीरे, मोहरी, लसण, कांदा घाला. त्यानंतर त्यात वाफवलेले फुंडके घाला. नीट परतवा. कोथिंबीर घालून खायला द्या,’मल्टी डाळ फुंडके’.
(हा नवा पदार्थ दोन व्यक्तीस पुरेल.)
मीनाक्षी काटकर
दारव्हा,जि.यवतमाळ
==========