गौरव मराठीचा

गौरव मराठीचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गौरव करा मराठीचा जयकार मराठी
प्राकृत महाराष्ट्री मराठी,अभिजात मराठी
महानुभवाची साती ग्रंथांची मराठी
वारकरीची मायमराठी,महानुभवाची धर्म मराठी।।१।।

ज्ञानेशाची रसाळ ,तुकयाची परखड मराठी
नामयाची प्रबोध ,माहीम्भटी सर्वज्ञ मराठी
महदाईसाच्या धवळेत अवरते मराठी
धर्मभाषा मराठी राजभाषा मराठी।।२।।

कुसूमाग्रजांची विशाखा मराठी
ज्ञानपीठ मराठी,सारस्वतांची मराठी
नारायण सूर्वेंची रानातली मराठी
केशवसूती नवकाव्यातली आधूनिक मराठी।।३।।

बोलीबोलीतूनी नानाविविधतेतुनी
प्रगटते मराठी संचारते मराठी
मराठीचे शिलेदाराच्या लेखणीतूनी
आविष्कारीते मराठी।।४।।

खान्देश,विदर्भ,मराठवाडा अन् कोकणातूनी
बहुरूपे बहुढंगी लिलया स्फुरते माय मराठी।।
ओवी ,अभंग,भारूड,लोकगीत,लोककथा,
वचन,सुक्ते,श्लोक ,संत महात्म्यांच्या वाणीतुनी
वहाते मराठी , झिरपते मराठी…।।५।।

तापी,नर्मदा,कृष्णा,कावेरी,गोदावरी जीवनदायी
डोंगरदरितूनी झुळझूळते महाराष्ट्राचं वैभव माय मराठी।।
क्रातिकारकांच्या रक्तातुननी सळसळते मराठी
संशोधकांच्या, साहित्यिकांच्या, मराठीच्या शिलेदाराच्या सृजनातूनी गौरंवांकित माय मराठी।।६।।

गणेश नरोत्तम पाटील
पाडळदा ता.शहादा जि.नंदुरबार
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles