हास्य तुझे
हास्य तुझे पहिले पहिले
वेड लावून गेले जीवाला
जिथे तिथे तुझाच भास
कसं समजावू या मनाला
उमलतात स्वप्नामधेही
ओठांच्या गुलाब कळ्या
मकरंद प्राशत भ्रमरापरी
दुनियेत जातो वेगळ्या
ह्रदय कोंदणी जपतोय
तुझे ते सुहास्य मोती
ओवीत ते क्षण मधुर
तुझे नाव ओठांवरती
कधी उमलतील कळ्या
फुलांत भरशील सुगंध
आतूरता त्या पळाची
मधुमास करशील धुंद
अरविंद उरकुडे
जि.गडचिरोली
=====