अजूनही यौवनात मी
“चाळीशी ओलांडली तरी
अजूनही यौवनात मी”
“चेहऱ्यावर जरी सुरकुत्या
तरीही यौवनात मी”
“नाही जून जाहली
अजूनही यौवनात मी”
“नाही शरीरात मेद
अजूनही सडपातळ मी”
“बालपणीची अजूनही
परीसारखी दिसते मी”
“काळ सरकला पुढे तरी
अजूनही यौवनात मी”
“कवेत घे मजला प्रिया
तुझीच साजणी मी”
“तू चंद्र ,मी चंद्रिका
अजूनही यौवनात मी”
“तुझ्या आठवणीत सख्या
चिंबचिंब बुडाले मी”
“नको मज विसरू
अजूनही यौवनात मी”
“तू नल, मी दमयंती
राजा तू अन राणी मी”
“वयाचे भान विसरुनी
अजूनही यौवनात मी”
हणमंत गोरे
मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर
========