सहलीची मजा

सहलीची मजा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शैक्षणिक सहलीची,मजाच भारी
मनसोक्त हुंदडली, पोरं अन् पोरी

सहल ती मजेशीर, चाकुर वृंदावन
पाहून सर्वांचं,प्रफुल्लित झाले मन

पोंहचता साऱ्यांनी,डब्बे केले फस्त
भुक भागलीय,पोहण्यात दंग मस्त

स्विमिंग पुलामधी,उतरतांना भ्याले
पुन्हा बाहेर जाचे, नाव नाही घ्याले

मनमुराद पोहण्याचा,आनंद लुटला
प्रसंगी काळजाचा,ठोकाही चुकला

क्षणिक विसरले वय, गुरुजन सारे
बाल्यावस्थेचेचं अंगी,संचारले वारे

अंगावर झेलतांना,पाण्याचे फवारे
तल्लीन होत नाचले, डीजेवर सारे

घसरगुंडीवरून,टायरने येत खाली
मी मी म्हणाऱ्याची, भंबेरी उडाली

पोहून झाले,भुका लागल्या सर्वाला
चिवडा अन् केळीवरचं ताव मारला

साखर कारखानाही,झाली क्षेत्रभेट
गरमा गरम ती,साखर खाल्ली थेट

अशी झाली सहल,खूप खूप न्यारी
तृप्त झाले मुले,आनंदून गेली सारी

बी एस गायकवाड
पालम ,परभणी
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles