नेतृत्व

नेतृत्व



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के’
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के’

नेता हा लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसणारा प्रतिष्ठित शब्द. पण नेता ही भूमिका वठवणारी व्यक्ती ही प्रामाणिक असते का? नेता म्हणजे नेतृत्व करणारा तो कसा असावा? तर त्यासाठी आपल्याकडे खूप निकष लावले जातात. आदर्शवादाचे सर्व तत्व त्याच्या नसा नसात भिनलेले असायला हवे. ‘आयुष्यात जोखीम पत्करा’ ‘जिंकलात तर नेतृत्व..’! आणि ‘हरलात तर मार्गदर्शन!. या पद्धतीने जर विचार मनी बाळगले तर तो कुशल नेतृत्व करू शकतो. आपल्या शरीरातील मेंदू आपल्या संपूर्ण शरीराचे नेतृत्व करणारा असतो. आणि तो सर्व मान्यही झाला. पण तरीही एकदा या अवयवांत नेतृत्वावरून वाद झाला. मेंदू म्हणाला, ” मी सर्वश्रेष्ठ..”. हृदयाला स्वतःबद्दल खात्री होतीच… डोळ्यांना जग दिसत होतं… या सर्वांनी श्रेष्ठ नेतृत्व आपल्याकडे असायला पाहिजे असा दावा केला. तेव्हा मोठ आतडं आलं धावून. सगळ्यांनी त्याची थट्टा केली.तेव्हा त्याला खूप राग आला. व त्याने संपावर जायचं ठरवलं.. मग काय त्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण बंद केलं. शरीरातील हे विषारी द्रव्य शरीरातच राहू लागली. आणि त्यामुळे शरीराची सर्व अवस्था कोलमडली परिणामी त्याला त्यावेळी नेतृत्व देणं भाग पडलं .पण……. !

‘नेतृत्व हा माणसाचा खास गुण’ नेतृत्व ही फक्त वैयक्तिक शक्ती नसून त्याचा परिणाम इतरांवर देखील होत असतो. नेतृत्व म्हणजे एखाद्या कडून मिळालेली पदवी, कामातील बढती, किंवा हुद्दा नाही तर ती एखाद्या कडून किंवा समूहाकडून केली जाणारी अपेक्षा असते. नेतृत्व म्हणजे ठरवून दिलेली किंवा घेतलेली जागा नसून व्यक्तीकडून होणारी कृती असते. जर नेतृत्व म्हणजे अधिकार, असे आपण मानले तर त्याबरोबरच ती जबाबदारीही असते हेही विसरायला नको. नेतृत्व करायचं असेल तर अनुभव देखील गरजेचे असते. आपला आत्मविश्वास दांडगा असायला हवा. पण त्याबरोबरच विश्वास ठेवणं सुद्धा फार गरजेचं असतं. विश्वासाने पर्वत सुद्धा हलवता येतो म्हणतात.. नेतृत्व कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं नव्हे तर ते समूहाचं करायचं असतं. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक लक्ष्मण रेषेचं भान ठेवणं गरजेचं असतं. वरील सर्व गुण नेतृत्व करणाऱ्या कडे असायला हवेत. हे कोणा एकाकडे असतात का? तर नाही.

नेतृत्व करण्यासाठी माणसाने स्वतः जागृत असणे, जे काम आपल्याला करायचे आहे त्या कार्याबद्दल सखोल माहिती असणे एवढेच नव्हे तर नेतृत्व करताना आपल्या हाताखाली सल्ल्यानुसार वागणाऱ्यांना समजावून घेणं , त्यांच्या मताचा आदर करणे…. योग्य दृष्टिकोन योग्य वागणूक देणे.. हे ज्याला सहज साध्य करता येतं तोच नेतृत्व करू शकतो. आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्याजवळ निर्णय शक्ती ही ‘निश्चित आणि निश्चिंत’ असावी.. ती डळमळीत नको. भिडस्त स्वभाव नेतृत्व करणाऱ्याला कधीच साथ देणार नाही.इथे स्पष्टवक्तेपणा तर हवाच पण तो दाखवताना भावनांचा विचार आणि आदर करण्याचाही विचार व्हायला हवा. नेतृत्व करणारा फक्त आपल्या समूहाला चालना देतो असे नसून तो स्वतः देखील प्रेरणा देत असतो व सहकाऱ्यांना किंवा गटाला कामाची स्फूर्ती देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. यश मिळवून देण्यात सहकार्य करणं ही त्याची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य असते.

कोणत्याही सामूहिक कामात संस्थेत कार्यालयास संस्थेस तेव्हाच यश मिळते जेव्हा नेतृत्व करणारा खंबीरअसतो. नेतृत्व करणाऱ्या च्या मागची गर्दी वाढवायची असेल तर त्याला नेतृत्वाचे श्रेय घेताना अशा काही व्यूह रचना करणं गरजेचं असतं. इथे सहकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करणं गरजेचं असतं. कार्याचे नियोजन आवश्यक असते नेतृत्व करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची चौफेर चौफेर विकास होणे आवश्यक असते. नेतृत्व हे उसनं मिळत नाही म्हणतात ते निर्माण करावे लागतं. ‘दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगड विटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस होऊ शकतो.

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर

==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles