पाणपोई
पारा वाढता उन्हाचा
आठवते पाणपोई
पूर्वी चौकाचौकांमध्ये
दिसायची पाणपोई
येता जाता वाटेवर
थांबे पिण्यास पांथस्थ
घेई क्षणाची विश्रांती
मग व्हायचा मार्गस्थ
भरगच्च वृक्षाखाली
काळ्या रंगाचे रांजण
भोवताली लालवस्त्र
दोन प्याले नि झाकण
तहाणलेल्यांना पाणी
हिच आपली संस्कृती
सामाजिक सेवासंस्था
पाणपोई उभारती
आता मात्र दुर्दैवाने
पाणपोई झाली लुप्त
विकतच्या बाटलीने
होते का शरीर तृप्त?
कुशल गो डरंगे, अमरावती